google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खबरदार! मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटप केल्यास कडक कारवाई

Breaking News

खबरदार! मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटप केल्यास कडक कारवाई

खबरदार! मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटप केल्यास कडक कारवाई


सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने प्रभावी नियोजन करण्यात येत आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची अंमलबजावणी, काटेकोर निवडणूक खर्चावर नियंत्रण, 

आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे तसेच मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या रोख रक्कम, दारू व भेटवस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटप केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक

 गुरूवार दि. १८ डिसेंबर रोजी या बैठकीत निवडणूक काळातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्या व समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू प्रकाश महानवर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, 

संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, उप विभागीय अधिकारी 

एस. एम पडदुणे, उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त गिरीष पंडित, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील,

महावितरण सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे जीएसटी अधिकारी

 मनीष एम. एम, आयकर अधिकारी विशालकुमार, नगर सचिव प्रवीण दंतकाळे, बैंक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक 

संजीव कुमार, राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल. 

नागरिकांनीही आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

सादर रोख व बेहिशेबी आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे, तपास, शोध व जप्तीची कार्यवाही करणे, 

निवडणूक खर्च नियंत्रणास सहाय्य करणे व निवडणूक यंत्रणेशी समन्वय साधून अहवाल करणे.

विक्रीकर उपायुक्त यांनी बेहिशेबी वस्तू व करचुकवेगिरीवर कारवाई, निवडणूक खर्चाशी संबंधित व्यवहारांवर लक्ष ठेवणे,

 जप्ती, दंड व तपासाची कार्यवाही तसेच निवडणूक यंत्रणेशी समन्वय करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments