सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे तरसाचा वावर; नागरिक भयभीत सौ.शोभा सुरेश कदम, सरपंच, चिकमहुद
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महुद / प्रतिनिधी चिकमहुद (ता. सांगोला) येथील विक्रम सरगर यांच्या घराशेजारील शेतामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तरस या वन्यप्राण्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे.
त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर तरस हा भरदिवसा व रात्रीच्या वेळी शेताजवळ तसेच वस्तीच्या दिशेने फिरताना अनेकांनी पाहिल्याचे सांगितले आहे.
यामुळे शेतातील जनावरे, लहान मुले व वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा -
प्रश्न निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी बाहेर पडणे धोकादायक बनले आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना गोठ्यात - बांधून ठेवण्यास सुरुवात केली असून शेतात - जाणे टाळले जात आहे.
याबाबत नागरिकांनी वन विभागाकडे फोनद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला असता - सदर अधिकारी यांनी फोन घेतला नाही. अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
तातडीने पिंजरा लावणे, परिसरात गस्त वाढवणे तसेच तरसाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर एखादी अनुचित
वन विभागाचे दुर्लक्ष
घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी चिकमहुद परिसरातील नागरिकांकडून होत आहे.भीतीचे वातावरण
चिकमहुद परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरसाचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून नागरिक,
विद्यार्थ्यांच्या व जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात वन विभागाने तातडीने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावणे व तरस पकडून जंगलात सोडणे
तसेच नियमित गस्त वाढवणे व आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
-शोभा सुरेश कदम, सरपंच, चिकमहुद


0 Comments