धक्कादायक..'भरधाव दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू';
सांगाेला तालुक्यातील घटना, दुचाकीच्या मागे बसल्या हाेत्या अन् काय घडलं..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : खवासपूर (ता. सांगोला) येथील शिवारात भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात
दुचाकीच्या मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू चंद्रा टिंगरे (रा. लोटेवाडी, ता. सांगोला) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच ४५ बीबी १४६९) ही दिघंची ते खवासपूरला जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता.
खवासपूर गावातील मराठी शाळेजवळील गतिरोधकावरून गाडी वेगात गेल्याने दुचाकीवरील मागे बसलेल्या सुनीता अशोक लोहार (वय ३३, रा. गोंदावले, ता. माण, जि. सातारा) या खाली पडल्या.
त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृत महिलेचे
पती अशोक बबन लोहार (वय ४०, रा. गोंदावले, ता. माण, जि. सातारा) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार बोराटे करीत असून, गुन्ह्याची नोंद पोलिस हवालदार माने यांनी केली आहे.


0 Comments