सांगोल्यात शांतता व संयम राखण्याचे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भावनिक आवाहन ; २१ डिसेंबर रोजी मतमोजणी.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार असून या पार्श्वभूमीवर ॲड. मा.आमदार शाहजी (बापू) पाटील शिवसेना
(एकनाथ शिंदे गट) यांचेकडून सर्व शिवसैनिकांच्या कार्यकर्ते व नागरिकांना शांतता, संयम आणि शिस्त राखण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व सांगोल्याचे लोकप्रिय नेतृत्व ॲड मा.आ.शहाजी (बापू) पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवण्यात आली असून निकालाबाबत सकारात्मक वातावरण आहे.
मात्र मतमोजणीदरम्यान कोणताही जल्लोष, घोषणाबाजी, हुल्लडबाजी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्थेला
बाधा पोहोचेल असे कृत्य करू नये, असे स्पष्टपणे शिवसेनेचे सर्व कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे.
सांगोला नगरपालिकेच्या मतमोजणीच्या दिवशी सांगोला शहराची शांतताप्रिय परंपरा जपत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी
तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर हार, शाल, फेटे, बुके, फटाके किंवा जल्लोष टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विजयाचा आनंद व्यक्त करताना तो संयमित, सुसंस्कृत आणि सकारात्मक पद्धतीने साजरा करावा तसेच शहराच्या सामाजिक सलोख्याला तडा जाईल
असे कोणतेही कृत्य करू नये अशी नम्र पण ठाम भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे.


0 Comments