google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील व शहरातील मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील गटाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस मा. आमदार श्री. दिपकआबा साळुंखे-पाटील

Breaking News

सांगोला तालुक्यातील व शहरातील मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील गटाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस मा. आमदार श्री. दिपकआबा साळुंखे-पाटील

सांगोला तालुक्यातील व शहरातील मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील गटाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक


आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस मा. आमदार श्री. दिपकआबा साळुंखे-पाटील

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी सांगोला तालुका व शहरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, युवती मंचच्या सर्व कार्यकर्त्या, महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या व सर्व सेलचे अध्यक्ष यांनी सदर बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

: विषय :

१) मागील सभेचे विषय वाचून कायम करणे.

२) नुकत्याच झालेल्या सांगोला नगरपारिषदेच्या निवडणूकी बाबत चर्चा करणे.

३) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीबाबत विचारविनिमय करणे.

४) टेंभू, म्हैसाळ योजनेतून, निरा उजवा कालवा, कोरडा व माण नदीवरील तसेच तालुक्यातील लाभक्षेत्रातील सर्व लहान व मोठे पाझर तलाव, को. प. बंधारे उन्हाळी हंगामासह वर्षातुन तीन वेळा भरुण द्यावेत.

५) म्हैसाळ योजनेतून जवळा तलाव, घेरडी तलाव, पारे तलाव, हंगिरमे तलाव हे सर्व तलाव वर्षातुन तीन वेळा पुर्णक्षमतेने भरून देण्यात यावेत तसेच वाणीचिंचाळे (वाकीघेरडी) तलाव भरुन देण्यात यावा तसेच जवळा तलाव भरुण देऊन शिर ओढयातून आफ्रुका नदीवरील सर्व को. प. बंधारे भरुण देण्यात यावेत.

६) उजनी धरणातील सांगोला तालुक्याच्या वाट्याचे २ टी.एम.सी. पाणी त्वरीत देण्यात यावे.

७) टेंभू योजनेतून बुध्देहाळ तलाव भरुन देण्यात यावा.

८) गेल्या दोन महिन्यापुर्वी तालुक्यामध्ये सर्वच गावात आवकाळी पाऊस व अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके, फळबागा वाहून जाऊन मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले असुन तातडीने राहिलेल्या सर्व शेतकन्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे.

९) दुध उत्पादक शेतकऱ्यांचे व दुध संस्थांचे ५ रुपये अनुदान अनेक महिण्यापासुन प्रलंबित आहे ते तातडीने जमा करण्यात यावे.

१०) टेंभु योजने कडील बुध्देहाळ तलाव व निरा उजवा कालवा विभागाकडील चिंचोली तलाव हे दोन्हीही तलाव टेल टैंक म्हणून जाहीर करण्यात यावेत उरमोडी धरणातून राजेवाडी तलाव वर्षांतुन दोन वेळा भरून देण्यात यावा.

११) तालुक्यातील नदी, नाले, ओवधावरील सर्व को.प. बंधाऱ्यांची गळती थांबवुन तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.

१२) निपरा उजवा कालव्यातुन चिंचोली तलाव वर्षातुन २ वेळा भरून देण्यात यावा.

१३) शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यात यावा.

१४) विजेच्या समस्या / आडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने मार्गकाढण्यात यावा तसेच शेतीला पुर्ण क्षमतेने विज पुरवठा करण्यात यावा.

१५) तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या अडचणी जाणून घेणे.

१६) संघटना वाढविणे व धोरणात्मक निर्णय यावर विचार विनिमय करणे.

१७) मा. अध्यक्षसो यांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्यावेळच्या विषयाबाबत चर्चा करणे,

*** आपले विनित***

श्री. मधुकर बनसोडे

श्री. सुभाष उर्फ तानाजीकाका पाटील

वेळ : मंगळवार दिनांक १६/१२/२०२५

रोजी दुपारी १२.०० वाजता स्थळ : आनंद लॉन्स, वासुद रोड, सांगोला

Post a Comment

0 Comments