google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने मंगळवारी होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

Breaking News

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने मंगळवारी होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने मंगळवारी होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ; तालुका प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या 

असताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. 

मंगळवार दि १६ डिसेंबर रोजी दु. १२ वा. शहरातील आनंद लॉन्स येथे ही बैठक संपन्न होणार आहे अशी माहिती ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील आणि मधुकर बनसोडे यांनी दिली. 

नुकत्याच पार पडलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या संबंधित विचार विनिमय करणे तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करणे

 आणि सांगोला तालुक्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याबाबत

 तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना न मिळालेल्या वाढीव अनुदानाची रक्कम मिळावी, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी, 

टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तलाव तर नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून चिंचोली तलाव वर्षातून किमान दोन वेळा भरून द्यावा 

यांसह टेंभू योजना म्हैसाळ योजना नीरा उजवा कालवा योजना पूर्णपणे कार्यान्वित करून सांगोला तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळावे 

तालुक्यातील माण कोरडा आणि आफ्रुका नदीवर असणाऱ्या सर्व बंधाऱ्यांची गळती रोखून त्यांची दुरुस्ती व्हावी 

यासह सांगोला शहर आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विजेबाबत असणाऱ्या समस्या जाणून त्यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. 

त्याचबरोबर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. 

सांगोला शहर आणि तालुक्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत

 दिपकआबांनी शेकाप आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना

 मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे आता संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

दरम्यान मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीस सांगोला शहर व तालुक्यातील माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर

 प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित यावे असे आवाहन जेष्ठ नेते तानाजी काका पाटील आणि मधुकर बनसोडे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments