google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कवी राकेश डाफळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा "कोकण रत्न" पुरस्कार जाहीर

Breaking News

कवी राकेश डाफळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा "कोकण रत्न" पुरस्कार जाहीर

कवी राकेश डाफळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा  "कोकण रत्न" पुरस्कार जाहीर


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी/समाधान मोरे 

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेलं कळंबस्ते (मलदेवाडी) या छोट्याशा गावातील "राकेश प्रभावती बुधाजी डाफळे" यांना सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दखल घेऊन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच

 कोकण रत्न पदवी पुरस्कारासाठी अधिकृत घोषणा केली आहे. राकेश डाफळे यांना हा पुरस्कार शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन,

 आझाद मैदान शेजारी होणारा हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार, संपादक मा. सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत.

      सामाजिक क्षेत्राची दखल घेऊन त्यांना "महाराष्ट्र राज्य कोविड योद्धा पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे.

       साहित्य क्षेत्रातील भारतभूषण- राष्ट्रीय पुरस्कार, काव्यगौरव- राष्ट्रीय पुरस्कार  या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  

राष्ट्रीय कवी संमेलन आणि आंतरराष्ट्रीय संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.  साहित्यसंपदा आयोजित विश्व विक्रमी संमेलनात सहभाग घेतला होता याची दखल एबीपी माझा या वाहिनीने घेतली.  

रेडिओ पुणेरी आवाज या वाहिनीवर कविता, चारोळ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. २०२१ कवींच्या २०२१ कविता या विश्वविक्रमी महाकाव्यग्रंथात सहभाग आणि याचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

तसेच अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनात पुरस्कृत करण्यात आले आहे. त्यांना साहित्यिक समूहाच्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत  आणि उपक्रमात २५० ते ३०० हून अधिक सन्मानपत्रांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

        कवी "राकेश प्रभावती बुधाजी डाफळे" यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानाची पदवी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल साहित्यिक क्षेत्रात कौतुक होत असून हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments