google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..१४ महिन्यांच्या लेकराला विष पाजलं, नंतर आईने स्वत:ला संपवलं; सोलापूर हादरलं

Breaking News

खळबळजनक..१४ महिन्यांच्या लेकराला विष पाजलं, नंतर आईने स्वत:ला संपवलं; सोलापूर हादरलं

खळबळजनक..१४ महिन्यांच्या लेकराला विष पाजलं, नंतर आईने स्वत:ला संपवलं; सोलापूर हादरलं


सोलापुरात एका २५ वर्षीय महिलेनं चिमुकल्याला विष पाजून आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

 बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

 महिलेचं नाव अंकिता वैभव उकिरडे असं असून तिला १४ महिन्यांचा मुलगा आहे.

अंकिताने मुलाला विष पाजलं. त्यानंतर साडीने गळफास घेत आत्महत्या केली. 

शुक्रवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. अंकिताचा मुलगा अन्विक वाचला आहे तर अंकिताचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंकिताचं चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी लग्न झालं. वर्षभरापूर्वीच एक मुलगा झालाय. 

शुक्रवारी घरातले लोक कामानिमित्त बाहेर गेले असताना अंकिता घरी मुलासोबत एकटीच होती. 

त्यावेळी तिनं मुलाला विष पाजलं आणि त्यानंतर फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.

अंकिताने घरात आत्महत्या केल्यानंतर घरकामासाठी मोलकरीण घरी आली होती. तिनं जेव्हा दरवाजा उघडला जात नसल्यानं खिडकीतून डोकावलं 

तर अंकिताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर चिमुकला अन्विक अंत्यवस्थ अवस्थेत दिसून आला.

अंकिताने तिच्या १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजल्यानं त्याची प्रकृती गंभीर झाली होती.

 त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. चिमुकल्याची मृत्यूशी झुंज सुरू होती.

 सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आलंय मात्र अजूनही प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात येणार आहे. 

अंकिताने हे पाऊल का उचललं हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीय .

जालन्यात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

वालसावंगी येथील विवाहित महिला जयाबाई पांडुरंग गवळी (वय. 38) तर गणेश उत्तम वाघ( वय. 24)या प्रेमी युगुलाने वाढोणा 

ता. भोकरदन परिसरात कालिंका देवी मंदिर परिसरात डोंगर पर्वत रांगांमध्ये एका सागवनाच्या झाडास एकाच दोरीने दोघांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. 

याची माहिती दीपक अशोक गवळी यांनी पारध पोलिसांना दिल्यावरून पोलिसांनी दोन्ही मृत्यूदेह खाली काढून, 

पंचनामा करून मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी धावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Post a Comment

0 Comments