google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ हिमालय घोरपडे यांचा आदर्श शिक्षण संस्थेच्यावतीने सत्कार

Breaking News

डॉ हिमालय घोरपडे यांचा आदर्श शिक्षण संस्थेच्यावतीने सत्कार

डॉ हिमालय घोरपडे यांचा आदर्श शिक्षण संस्थेच्यावतीने सत्कार 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश  मिळवल्याबद्दल डॉ हिमालय घोरपडे यांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श प्रशालेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे मॅडम यांचे चिरंजीव डॉ हिमालय बाळकृष्ण घोरपडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या

 राज्यसेवा परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम,सचिव निलकंठ शिंदे सर 

 यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला, त्यांचे वडील डॉ बाळकृष्ण घोरपडे व आई सुवर्णप्रभा घोरपडे मॅडम यांचाही त्या यशात उल्लेखनीय वाटा असल्याचे सांगितले.

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने सत्कार करून त्याच्या कार्यास संस्थेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments