google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Breaking News

धक्कादायक! पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

धक्कादायक! पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेव्हण्याने


केलेल्या मारहाणीत मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

सोलापूर:- पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मेव्हण्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत करमाळा तालुक्यातील केम येथील भगवान श्यामराव गाडे यांनी करमाळा पोलिसात शनिवारी फिर्याद दिली आहे. दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास

 भगवान यांचा मुलगा विजय गाडे (वय ३१ रा. केम, ता. करमाळा) हा तिची पत्नी रोहिणी हिला भेटण्यासाठी राहुल संजय धोत्रे यांच्या वीटभट्टीवर गेला होता.

तेथे त्याचा मेव्हणा राहुल अशोक धवसे (मूळ रा. मस्तानशाहनगर ता. जि. हिंगोली सध्या रा. केम, ता. करमाळा) याने 'तू माझ्या बहिणीला भेटायला का आला?

 मी तुला तिला भेटू देणार नाही,' असे म्हणून विजय यास शिवीगाळ करून हाताने व लाथा-बुक्क्यांनी त्याच्या पोटावर मारहाण केली,

तसेच बाजूला पडलेल्या हत्याराने त्याच्या पोटावर वार केला. यात विजय गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता, त्याची प्रकृती खालावून मृत्यू झाला.

गाडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी राहुल अशोक धवसे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

शनिवारी दुपारी आरोपीला करमाळा न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायाधीश श्रीमती कुलकर्णी यांनी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments