प्रभाग क्रमांक १ मध्ये आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व दिपकआबांच्या कार्नर सभेस भरघोस प्रतिसाद -


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( प्रतिनिधी )- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १ मध्ये 

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दिपकआबांच्या कार्नर सभेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 

शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर व प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक पदाचे उमेदवार नवनाथ शिंगाडे व  सौ.मिराताई मस्के यांच्या प्रचारासाठी

 आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कार्नर सभा घेतली.

यावेळी डॉ.निकिताताई  देशमुख, भाजपचे नेते उद्योगपती मा.बाळासाहेब एरंडे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी उपस्थित होते.

यावेळी उमेदवार व डॉ. निकीताताई देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिपकआबा म्हणाले की,

आपण शहराचा विकास करण्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे.

आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आमचे शेलार मामा आहेत. त्यांना तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, आपण आग्रह करुन प्रभाग क्रमांक १ मध्ये दोन्ही उमेदवार हे 

शेकाप पक्षासाठी मागून घेतले असून प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांनी स्व. आबासाहेब यांच्यावर कायमच प्रेम केले आहे. 

स्व. आबासाहेब यांच्यानंतर ही पहिलीच नगरपालिका निवडणूक आहे व हा आबासाहेब यांचा बालेकिल्ला आहे,

 हे इथली जनता या निवडणुकीत पुन्हा सिध्द करेल हा विश्वास व्यक्त केला. या प्रचार सभेस प्रभागातील भरघोस प्रतिसाद दिला.