Breaking News

सांगोला नगरपरिषद निवडणूक भाजप-शेकाप – दीपक आबा साळुंखे पाटील आघाडीची ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्याची जाहिर सभा उपमुख्यमंत्र्यांच्या व बापूच्या टीकेला काय उत्तर देणार याची उत्सुकता

सांगोला नगरपरिषद निवडणूक भाजप-शेकाप – दीपक आबा साळुंखे पाटील आघाडीची 


ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्याची जाहिर सभा उपमुख्यमंत्र्यांच्या व बापूच्या टीकेला काय उत्तर देणार याची उत्सुकता

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला काही दिवस उरले

 असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक गट आपल्या ताकदीचे प्रदर्शन करीत असताना, 

भाजप व शेतकरी कामगार पक्षा व दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या संयुक्त आघाडीने सांगोल्यात मोठा राजकीय मेळावा जाहीर केला आहे. 

या जाहिर सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगोल्यात दाखल होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असून, भाजपा-शेकाप-दीपकआबा साळुंखे-पाटील गट या एकत्रित आघाडीचा 

हा शक्तिप्रदर्शनाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या आघाडी कडून नगराध्यक्ष पदासाठी श्री. मारुती (आबा) तुळशीराम बनकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

राजकीय पातळीवर सांगोला हे परंपरेने विविध गटराजकारणासाठी ओळखले जाणारे 

शहर. भाजपची येथे स्वतंत्र शक्ती मर्यादित मानली जात असली तरी, या वेळच्या आघाडीच्या बांधणीमुळे समीकरणात मोठा बदल झाला आहे.

 दीपकआबा साळुंखे-पाटील गटाची पकड, शेकापचे स्थानिक जाळे आणि भाजपचे राज्यस्तरीय नेतृत्व या तिन्हींच्या संयोजनामुळे या पॅनेलला नगरपरिषद निवडणुकीत बळ मिळत असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वा. छ. शिवाजी महाराज चौक येथे होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

 त्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवारांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

गत निवडणुकींच्या तुलनेत ही निवडणूक अधिक चुरशीची आणि नाट्यपूर्ण ठरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

वॉर्डनिहाय जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. 

प्रत्येक वॉर्डात स्थानिक पातळीवर सक्रिय, परिचित आणि कार्यतत्पर उमेदवार देण्यात आले असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जाते.

 विशेषत: नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुती आबा बनकर हे शांत,ज्येष्ठ, अनुभवी आणि सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय नेते म्हणून ओळखले

 जात असल्यामुळे, या पॅनेलची दृष्टी ‘विकास’ आणि ‘स्थैर्य’ या दोन मुद्द्यांवर केंद्रित असल्याचे स्पष्ट होते.

एकूणच पाहता, सांगोल्यातील निवडणुकीची रंगत आता अधिकाधिक वाढताना दिसते. 

जाहीर सभा, पॅनेल जाहीरनामे, राजकारण आणि मतदारांचा कल—या सर्व घटकांमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या सभेनंतर भाजप-शेकाप दीपक आबा साळुंखे पाटील या आघाडीची लाट उठते का, शिवसेना आणि 

शहाजी बापू पाटील प्रभावी ठरतात,की राजकीय डावपेचता तज्ञ प्रा.पी. सी झपके सर नवा डाव टाकतात हे पाहणे आगामी दिवसांत औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments