Breaking News

प्रभाग क्र 10 अ चे उमेदवार मनेरी हिना फिरोज यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद.

प्रभाग क्र 10 अ चे उमेदवार मनेरी हिना फिरोज यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद.


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला नगरपरिषद निवडणुकीमध्ये सांगोला शहरातील प्रभाग क्रमांक 10 च्या अपक्ष उमेदवार मनेरी हिना फिरोज यांना प्रभागातील नागरिकाकडून व मतदाराकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 त्यांचे बेल्ट (पट्टा) हे चिन्ह असून मनेरी हिना फिरोज या काँग्रेसचे शहराध्यक्ष फिरोज मनेरी यांच्या पत्नी आहेत तर फिरोज मनेरी यांनी प्रभागातील अनेक नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिले आहेत

.व त्यांनी सामाजिक कार्यामध्ये चांगले काम केले आहे. आर्ट ऑफ गीविग संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी महिला यांच्यासाठी चांगल्या प्रकारचे काम केलेले आहे याचा फायदा हिना फिरोज मनेरी यांना होणार आहे. 

         अनेक प्रलंबित विकास कामे तसेच प्रभागातील विकास कामे माझ्या माध्यमातून शंभर टक्के पूर्ण करून प्रभागाचा विकास करणार असल्याचे मत अपक्ष उमेदवार हिना फिरोज मनेरी यांनी  व्यक्त केले आहे.  

प्रभागामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून विविध सामाजिक कार्यामध्ये त्या नेहमी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

     त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके यांना सुद्धा या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यांनाही या प्रभागातून मोठ्या प्रमाणात लीड मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments