google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लाडक्या बहिणींसाठी भावाने उभारला मोफत ई-केवायसी कॅम्प मा.नगरसेवक श्री.ज्ञानेश्वर तेली यांचा अभिनव उपक्रम

Breaking News

लाडक्या बहिणींसाठी भावाने उभारला मोफत ई-केवायसी कॅम्प मा.नगरसेवक श्री.ज्ञानेश्वर तेली यांचा अभिनव उपक्रम

लाडक्या बहिणींसाठी भावाने उभारला मोफत ई-केवायसी


कॅम्प मा.नगरसेवक श्री.ज्ञानेश्वर तेली यांचा अभिनव उपक्रम 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला नगरपरिषदेचे मा.नगरसेवक व शिवसेचे शहराध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली यांनी सांगोला तालुक्यातील  लाडक्या  बहिणींसाठी 

एक आगळावेगळा उपक्रम राबविला असून सांगोला शहरातील वज्राबाद पेठ येथील कस्तुरे हॉस्पिटल समोर मोफत ईकेवायसी कॅम्पचे आयोजन केले आहे.

श्री.ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली यांनी दूरदुष्टीतून लाडक्या बहिणींसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला असून  योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिंणींना कोणत्याही समस्या

 किंवा अडचणी येवू नयेत, व लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी त्यांनी मोफत ई-केवायसी कॅम्पचे आयोजन केले आहे. 

कॅम्पप्रसंगी येताना आधारकार्ड,  पतीचे / वडिलांचे आधारकार्ड,  आधार लिंक मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे आवश्यक  आहे.

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना  श्री.ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या विनामूल्य मदतीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश जाणार आहे. 

चौकट:- दिवाळीच्या सणात सर्वजण भेटवस्तू देतात, पण मला माझ्या बहिणींना सुविधा देणारी भेट द्यायची होती.त्यातूनच या ई-केवायसी कॅम्पची कल्पना सुचली. 

त्यानंतर मा.आ.शहाजीबापू पाटील यांच्या प्रेरणेने माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, मा. नगराध्यक्षा सौ.राणीताई माने,माजी गटनेते आनंदा भाऊ माने, 

 माजी नगरसेविका सौ.छायाताई मेटकरी , माजी नगरसेवक अस्मिर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ई-केवायसी कॅम्प उभारणीचा निर्णय घेतला असून कॅम्पचा सांगोला शहरासह तालुक्यातील महिला भगिनींनी लाभ घ्यावा.

 श्री.ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली, मा.नगरसेवक, सा.नं.पा.

Post a Comment

0 Comments