google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायत जवळा यांचा पर्यावरण पूरक स्तुत्य उपक्रम.सरपंच श्री. सज्जन मागाडे,

Breaking News

ग्रामपंचायत जवळा यांचा पर्यावरण पूरक स्तुत्य उपक्रम.सरपंच श्री. सज्जन मागाडे,

ग्रामपंचायत जवळा यांचा पर्यावरण पूरक स्तुत्य उपक्रम.सरपंच श्री. सज्जन मागाडे,



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जवळा ग्रामपंचायत नेहमी नाविन्यपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम सदैव राबवीत असते.

     सांगोला तालुक्याचे खंबीर नेतृत्व व जवळा ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक मा. आ. दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या

 संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन जवळा ग्रामपंचायत करीत असते. स्वच्छ जवळा, सुंदर जवळा या ओळीप्रमाणे घरामधील कचरा व्यवस्थापनासाठी चालू 

आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतीचे करदाते घरपट्टी व पाणीपट्टी असा कर पूर्णपणे भरतील,

 त्यांना ग्रामपंचायतीकडून ओला कचरा व सुका कचरा अशा प्रकारचे दोन डस्टबिन मोफत देण्याचा मानस होता. 

आज तो जवळा ग्रामपंचायतचे विद्यमान आदर्श सरपंच श्री. सज्जन श्रीधर मागाडे यांनी सत्यात उतरवून दाखविला.

 ते सतत गावच्या विकासाचा वसा घेऊन राजकारण न करता समाजकारण करण्याचा सदैव प्रयत्न करीत असतात.

 यातूनच व्यापारी वर्ग, हॉटेल व्यवसायिक, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांच्या कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यासाठी मोठ्या आकाराचे सार्वजनिक ठिकाणी

 सुमारे 60 डस्टबिन देऊन गावातील कचऱ्याचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन करण्यात आले. त्याचबरोबर आज पासून चालू आर्थिक वर्षामध्ये ज्या करदात्यांनी एप्रिल पासून आपली घरपट्टी 

व पाणीपट्टी पूर्णपणे भरून ग्रामपंचायत सहकार्य केल्याबद्दल, ओला कचरा व सुका कचरा अशा प्रकारचे दोन डस्टबिन मोफत देण्यास सुरुवात केली आहे, ज्या करदात्यांनी या अगोदर चालू 

वर्षामधील पूर्णपणे आपला कर भरला असल्यास, त्यांनी ग्रामपंचायत सचिवालयामधून डस्टबिन घेऊन जावेत

 असे आवाहन सरपंच सज्जन मागाडे यांनी केले आहे. या उपक्रमाचे जवळा गाव व पंचक्रोशी मधून कौतुक होत आहे. 

        डस्टबीनचे वितरण करतेवेळी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सज्जन मागाडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. दत्तात्रय रसाळ (भाऊसाहेब ), 

सामाजिक नेते श्री. अनिलभाऊ सुतार, श्री. दीपक कांबळे व कर भरणा करणारे करदाते श्री. नितीन मागाडे.

Post a Comment

0 Comments