धक्कादायक..नदीवर कपडे धुण्यास गेलेल्या मायलेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू;
ऐन दिवाळी सणात मंगळवेढा तालुक्यात घडली दुर्घटना; संपूर्ण परिसरात पसरली शोककळा
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे भिमा नदीवर कपडे धुण्यास गेलेल्या एका २९ वर्षीय महिलेचा
व ९ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.
दरम्यान ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत महिला ज्योती संतोष काकणकी (वय २९) व मुलगा श्रेयश संतोष काकणकी (वय ९ वर्षे) रा. सिध्दापूर हे दि. २१ रोजी सकाळी ९.०० वा.
भिमा नदीमध्ये कपडे धुण्यास दोघेजण गेले होते. यावेळी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
यातील खबर देणारे अमोधसिध्द काकणकी यांना चुलत भाऊ संतोष यांचा फोन आला की तात्काळ गावात ये,
त्यावेळी खबर देणारे शेतातील काम सोडून तात्काळ भावाच्या घरी गेले. तेव्हा खबर देणाऱ्याचा भाऊ भिमा नदीकडे गेला होता. खबर देणारे ही भिमा नदीकडे गेले असता त्यांना तेथे गावातील लोक जमलेले दिसले.
त्यांनी पाहिले असता चुलत भावजय ज्योती व पुतण्या श्रेयस हे पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. गावातील लोकांनी पोलिसांना कळवून दोघा मयतांना पाण्याबाहेर काढून
ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे आणले त्यावेळी डॉक्टरांनी दोघांना तपासून ते पाण्यात बुडून मयत झाले असल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे.


0 Comments