google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोल्हापूर– कलबुर्गी रेल्वेचे अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषात स्वागत.

Breaking News

कोल्हापूर– कलबुर्गी रेल्वेचे अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषात स्वागत.

 कोल्हापूर– कलबुर्गी रेल्वेचे अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषात स्वागत.



माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशिल मोहिते–पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोल्हापूर–कलबुर्गी–कोल्हापूर (गाडी क्र. 01451 व 01452) ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

या सेवेचा शुभारंभ (फ्लॅग ऑफ) सांगोला रेल्वे स्थानक येथे मा. खासदार यांच्या सौभाग्यवती सौ. शितलदेवी धैर्यशिल मोहिते–पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  

कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सौभाग्यवती सौ. डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित होत्या. यावेळी फ्लॅग ऑफ समारंभ, रेल्वे इंजिन पूजन व चालकांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्ता सावंत (DS)तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, सांगोला शहर व तालुक्यातील नागरिक, शहीद अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments