डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा ३४ वा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / प्रतिनिधी - मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्य. व्यवसाय अभ्यासक्रम व
डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा ३४ वा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सांगोला तालुक्याचे दैवत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.डॉ. गणपतराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी सर यांनी केले
त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेली महाविद्यालयाची प्रगती सविस्तरपणे मांडली. सन २०२५-२६ पासून बी.कॉम व सन २०२६-२७ पासून बी.एस्सी आर्टीफिसिअल इंटेलिजन्स महाविद्यलामध्ये चालू होणार आहे असे सांगितले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. किसन पवार यांनी करून दिली त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि प्रमुख पाहुण्यांनी आतापर्यंत १० नामांकित पुस्तके लिहली असून त्यांना आतापर्यंत ८७ पुरस्कार मिळाले आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले कि स्वालंबी शिक्षण हे शिक्षणाचे ब्रीद घेऊन
कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांनी माणसातील माणूस ओळखला. तसेच बदलत्या परिस्थितीही आपला पक्ष न बदलता
एकनिष्ठपणे तालुक्यातील जनतेसाठी व पिचलेल्या समाजासाठी काम करणारे आबासाहेब यांनी सामान्य माणूस व शेतकरी यांच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था काढली.
आजचा तरुण तंत्रज्ञानामुळे संवादापासून दुरावत चालला आहे तसेच आजचा तरुण वर्गात येत नाही म्हणून अस वाटत कि आपण कुठे कमी पडतोय की काय ? शिक्षणामुळे मुले दुरावत चालले आहेत
कि काय तसेच सध्या नात्यामध्ये वांजपणा आला आहे, घरात संवाद नसेल तर घराचा बर्मुडा होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष युवा नेते डॉ. अनिकेत(भैय्या) देशमुख यांनी
महाविद्यलयाने नॅक मध्ये केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. तसेच आम्ही दर वर्षी समाज्याला गरज असणारे नव नवीन कोर्सेस चालू करू असे मत व्यक्त केले व प्रमुख पाहुण्यांच्या वास्तववादी कवितेसाठी त्यांचे अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमाला संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य बबनराव जानकर, संस्था सदस्य प्रा.दिपक खटकाळे, संस्था सदस्य प्रा.डॉ. अशोकराव शिंदे,
संस्था सदस्य प्रा. जयंत जानकर, न्यू. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. केशवराव माने सर, पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे मुख्यध्यापक श्री. दिनेश शिंदे सर तसेच
महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सीमा गायकवाड व प्रा.डॉ. शितल शिंदे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतीक कमिटीचे चेअरमन प्रा. अशोक कांबळे यांनी केले. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.


0 Comments