शासनाच्या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.. - नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे विक्रीकर निरीक्षक निखिल शिंदे यांचा सत्कार संपन्न...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचा जन्मदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
जयंतीनिमित्त सांगोला तालुक्यात नाझरे, सांगोला, हातीद, कोळा, जवळा, घेरडी, संगेवाडी, शिवने, महूद व सोनंद येथे शासनामार्फत मिळणारे जातीचे,
उत्पन्नाचे, रहिवासी, दिव्यांग, निराधार, आदिवास, वृद्धापकाळ, पेन्शन, नॉन क्रिमिनल इत्यादी दाखले मोफत देण्यासाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे.
तरी या शासनाच्या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी नाझरा विद्या मंदिर ता. सांगोला येथे उद्घाटन प्रसंगी केले.
सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच तलाठी निखिल शिंदे याची विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाल्याने त्याचाही सत्कार नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, पत्रकार रविराज शेटे, उद्योगपती उल्हास दादा धायगुडे, सोसा.
व्हा. चेअरमन गोरख भाऊ आदाटे, प्राचार्य बिभीषण माने यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मोफत दाखल्याचे वाटप ही करण्यात आले. सदर प्रसंगी तलाठी मधुकर वाघमोडे, राजेंद्र जाधव,
आलदर, शिंदे, वसवाडे, शिक्षक दिलीप सरगर, पोलीस पाटील लखन बनसोडे, सीता देवी पाटील, महसूल सेवक सुनील कोळी, विजय चव्हाण, मंगल सासणे, नवनाथ इंगोले, मच्छिंद्र रणदिवे, विलास चव्हाण,
कृषी सहाय्यक विक्रम सिंह वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण ढोबळे, पापासो काजी, महा-ई-सेवा केंद्र चालक, नागरिक, शेतकरी, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार वझरे तलाठी मधुकर वाघमोडे यांनी मानले.


0 Comments