google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक... सांगोला तालुक्यातील शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग- मोजणी होईपर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू

Breaking News

खळबळजनक... सांगोला तालुक्यातील शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग- मोजणी होईपर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू

खळबळजनक... सांगोला तालुक्यातील शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग- मोजणी होईपर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग करिता भूसंपादन प्रक्रिया आंदोलन पार्श्वभूमीवर 

सांगोला तालुक्यातील १५ गावाचे (पाचेगाव, एखतपूर, बंडगरवाडी (चोपडी), कोंबडवाडी, सोमेवाडी, बलवडी, चोपडी, मांजरी, वझरे, मेथवडे, चिंचोली, संगेवाडी,

 चिणके, य. मंगेवाडी, नाझरे) वेळापत्रक प्रमाणे मोजणीची कार्यवाही करत असताना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ 

दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजीचे रात्री १२ वाजलेपासून दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजीपर्यंत व मोजणी कार्यवाही पूर्ण होईपर्यंत लागू करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी बी. आर. माळी यांनी दिली.

या आदेशानुसार बेकायदेशीर जमाव जमविणे आणि मोजणी करण्यास अडथळा आणणे,शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांना मोजणी करण्यास विरोध करणे,

 पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येणे, ज्या गावाची मोजणी ज्या दिवशी होणार आहे त्या गावातील त्या गटाचे शेतकरी / हितसंबंधीत व्यक्ती खेरीज इतर इसमांना उपस्थित राहता येणार नाही.

हा आदेश मोजणी करिता येणारे शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी तसेच संपादन मंडळाकडून नियुक्त केलेल्या

 अधिकारी व कर्मचारी यांना तसेच ज्या गटाचे मोजणी करण्यात येणारे आहे त्या गटाचे हितसंबंधीत व्यक्ती / शेतकरी यांना मोजणीच्या वेळी उपस्थित राहण्यास लागू राहणार नाही. 

आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे उपविभागीय दंडाधिकारी बी. आर. माळी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

👇 पहा गावनिहाय मोजणीचे वेळापत्रक 👇

Post a Comment

0 Comments