google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे हणमंत मिसाळ यांची बिनविरोध निवड

Breaking News

पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे हणमंत मिसाळ यांची बिनविरोध निवड

पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या


उपसरपंचपदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे हणमंत मिसाळ यांची बिनविरोध निवड

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७९१२/८२०८२८४६४७)

 सांगोला (प्रतिनिधी) पाचेगाव खुर्द (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे कार्यतत्पर, लोकाभिमुख आणि 

विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व असलेले श्री.हणमंत तुकाराम मिसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 गावात सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.

      यापूर्वीचे उपसरपंच श्री.भारत मिसाळ यांचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देऊन लोकशाही परंपरा जपली.

 नव्या उपसरपंच निवडीसाठी जाहीर झालेल्या प्रक्रियेत हणमंत मिसाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. 

विरोधी अर्ज नसल्याने  निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सौ. मनीषा जावीर यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

ही निवड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संगीता भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा

 गजरासह  ग्रामस्थांनी गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. 

हणमंत मिसाळ हे गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, कृषी, व्यवसाय आणि पायाभूत विकासाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था,

 रस्ते व  महिला बचतगटांना आर्थिक बळकटी, युवकांसाठी खेळ सुविधा व रोजगार निर्मिती, तसेच शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारख्या अनेक उपक्रमांत त्यांचा पुढाकार राहिला आहे.

 गावातील सर्व समाजघटकांशी ते सुसंवाद ठेवतात आणि ऐक्याच्या भावनेने काम करण्यावर त्यांचा भर असतो.

या बैठकीस माजी सरपंच रामचंद्र मिसाळ, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन डॉ.राज मिसाळ, शिवाजीराव पाटील, 

लक्ष्मण मिसाळ, शिवाजी मिसाळ, शहाजी मिसाळ, प्रकाश मिसाळ, तानाजी मिसाळ, भारत मिसाळ, आण्णासो पाटील, 

शिवाजी मोहिते, तेजस मिसाळ, आबासाहेब मिसाळ, नाझरे (ता. सांगोला) येथील युवक नेते संभाजी हरिहर सर 

  जुनोनी गावचे युवा नेते ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 उपस्थित मान्यवरांनी मिसाळ यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देऊन भावी कार्यकाळासाठी भरभरून सहकार्याचे आश्वासन दिले.

चौकट

“गावातील सर्व समाजघटकांचा विश्वास आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे. पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती, महिला व युवकांसाठी 

विकास उपक्रम, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तत्काळ उपाय यावर प्राधान्याने काम करेन.

 गावातील ऐक्य राखून सर्वांगीण विकास साधणे हेच माझे ध्येय आहे. या जबाबदारीसाठी ग्रामस्थांचा पाठिंबा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”

. हणमंत तुकाराम मिसाळ, उपसरपंच, पाचेगाव खुर्द

 चौकट– 

“हणमंत मिसाळ हे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले, प्रामाणिक आणि मेहनती कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निवडीमुळे गावाच्या ऐक्य आणि विकासाला चालना मिळेल, 

असा मला विश्वास आहे. ग्रामपंचायतीचे काम पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने पार पडावे यासाठी ते कटिबद्ध राहतील.

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

Post a Comment

0 Comments