google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वर्गीय आम. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशनचा श्रीमती रतनबाई देशमुख यांच्या शुभ हस्ते श्री गणेशा

Breaking News

स्वर्गीय आम. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशनचा श्रीमती रतनबाई देशमुख यांच्या शुभ हस्ते श्री गणेशा

स्वर्गीय भाई डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर


,महा रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न



स्वर्गीय आम. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख मेडिकल  फाउंडेशनचा श्रीमती रतनबाई देशमुख यांच्या शुभ हस्ते श्री गणेशा







(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथी व जयंतीनिमित्त सांगोला तालुक्यातील शेतकरी कष्टकरी यांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाआरोग्य तपासणी व महाआरोग्य तपासणी व महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती रतनबाई गणपतरावजी देशमुख, डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख व विविध मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांनी घेतलेला जनसेवेचा वसा 

आणि वारसा पुढे अखंडपणे चालू ठेवण्याची काम देशमुख कुटुंबियांच्या माध्यमातून होत आहे. स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब मेडिकल फाउंडेशन चा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गणेशा करण्यात आला. 

हे फाउंडेशन स्थापन करण्यामागचे कारण की , स्वर्गीय डॉ.भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांनी जो ,सामाजिक बांधिलकी व जनसेवेचा वसा आणि वारसा घेतलेला आहे तो पुढे अखंडपणे चालू ठेवण्याचे काम देशमुख कुटुंबीयांच्या माध्यमातून होत आहे . 

स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांचे दोन नातू व नात सुना हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असून त्यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील व आजूबाजूच्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची मोफत आरोग्य  सेवा घडावी हे या माध्यमातून होत आहे.

 यासाठी स्वर्गीय भाई डॉ. गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या मेडिकल फाउंडेशन चा श्री गणेशा विविध मान्यवरांच्या  शुभ हस्ते करण्यात आला. डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख, डॉ.प्रभाकर माळी,डॉ.अमर शेंडे यांनी यावेळी विचार व्यक्त केले .

सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व तज्ञ डॉक्टर्स सदरच्या शिबिरासाठी उपस्थित होते यामध्ये ,डॉ. सुनिल कारंडे 

फिजिशियन,डॉ. सुनिता कारंडे  नेत्ररोग तज्ञ  ,डॉ अमित इनामदार - कैन्सर स्पेशालिस्ट,डॉ सचिन वाघमोडे कान नाक घसा तज्ञ ,डॉ हिमांशु कुलकर्णी स्पाईन सर्जन 

मिरज,डॉ अमर शेंडे आनंद हॉस्पिटल ,डॉ अजिंक्य नष्टे अजिंक्यतारा हॉस्पिटल ,डॉ .शिवराज भोसले ,डॉ.मच्छिंद्र सोनलकर दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाटील बालरुग्णालय  डॉ.बसवेश्वर पाटील  हॉस्पिटल,श्रीनंद हॉस्पिटल  डॉ राजेंद्र जानकर,

लवटे हॉस्पिटल डॉ सुनील लवटे ,सदगुरू हॉस्पिटल  डॉ धनंजय गावडे ,डॉ एच व्ही गावडे- गावडे बालरुग्णालय ,डॉ वैभव जांगळे स्पंदन हॉस्पिटल ,दिशा हॉस्पिटल डॉ सचिन गवळी ,डॉ. स्वाती  खंडागळे- स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित होते.

 सांगोला तालुक्यातील सर्व सोलापूर जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची संलग्न असणारे सर्व रुग्णालय आणि सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा सर्व स्टाफ कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय 

सांगोला यांचे सर्व डॉक्टर्स व सर्व स्टाफ कर्मचारी महा लॅब यांच्या माध्यमातून रक्त तपासणी करण्यात आली तसेच बोल डेन्सिटी टेस्ट  म्हणजेच हाडाची ठिसूळता तपासणी पुणे येथील वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून करण्यात आली. 

श्री नागेश बनसोडे तालुका समन्वयक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व टीम  यांच्यामार्फत सर्व रुग्णांना आयुष्यमान कार्ड व गोल्डन कार्ड काढून देण्यात आले.

 महाआरोग्य तपासणी शिबिरासाठी उद्योगपती श्री. गिरीशभाऊ नष्टे यांनी हॉल उपलब्ध करून दिला.

नँब आय कुपवाड सांगली आणि डॉ.थेंगील यांच्या वतीने डोळे तपासणी करण्यात आली. श्री शहाजी गडहिरे यांच्या अस्तित्व संस्था यांच्यामार्फत पूर्णपणे मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्तावित ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. विजय बंडगर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. निरंजन केदार यांनी केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रवीण घाडगे यांनी केले सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन हे लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांनी केले.

Post a Comment

0 Comments