google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. सांगोला पोलीसांची दमदार कामगिरी सांगोल्यात ८३ हजारांचा गुटखा पकडला

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. सांगोला पोलीसांची दमदार कामगिरी सांगोल्यात ८३ हजारांचा गुटखा पकडला

ब्रेकिंग न्यूज.. सांगोला पोलीसांची दमदार कामगिरी सांगोल्यात ८३ हजारांचा गुटखा पकडला


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला :- सांगोला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अचानक छापा टाकून ८३ हजार ६६३ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच ४ लाख रुपये 

किमतीची कार असा ४ लाख ८३ हजार ६६३ रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास सांगोला शहरातील धनगर गल्ली येथे केली आहे.

याप्रकरणी साठा मालक निशांत ऊर्फ टिल्लू महादेव मिसाळ (रा. सांगोला) यास ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सांगोला शहरातील धनगर गल्ली येथे एका पत्र्याच्या बंद खोलीत प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून विक्री होत असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली होती. 

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, 

पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बजाळे व मच्छिंद्र राजगे पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस कॉन्सटेबल गणेश कुलकर्णी मारुती पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र माळी, 

पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांच्या पथकाने शनिवार रोजी दुपारी ३ वा.च्या सुमारास अचानक या ठिकाणी छापा टाकून प्रतिबंधित गुटक्यासह (एम. एच. १४-सीएक्स ८४८९९) इको कार ताब्यात घेऊन कारवाई केली.

Post a Comment

0 Comments