मोठी बातमी..सांगोला नगरपरिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला प्रतिनिधी : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून,
२६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती
मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ऑगस्ट अखेरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाईल.
त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आक्षेप व सुचना विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. दरम्यान, सांगोल्यातील लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३४ हजार ३१७ इतकी होती.
अनुसूचित जातींची लोकसंख्या ८ हजार ५०३ असून अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४७० आहे.
त्यानुसार नवीन प्रभाग आराखड्यात १९
आसनांपैकी १२ सामान्य, २ अनुसूचित जातींसाठी, तसेच ५ महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
२०१६ साली नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १० प्रभाग होते व २० नगरसेवक निवडून आले होते.
प्रभागाची सरासरी लोकसंख्या २ हजार १४८ असून, तीन सदस्य निवडणाऱ्या प्रभागाची सरासरी लोकसंख्या ४ हजार ३७६ इतकी असेल.
सांगोला नगरपरिषद क्षेत्रात एकूण २३ नगरसेवकांची निवड होणार असून,
त्यासाठी ८ तीन सदस्यांचे आणि ७ दोन सदस्यांचे प्रभाग असतील. नगरपरिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेनंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर राज राजकीय हालचालींना वेग आला.
0 Comments