सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा कु. अनन्या शेंडे हिची राष्ट्रीय पातळीवरील मिस आणि मिस्टर टीन इंडिया २०२५ स्पर्धेमध्ये अंतिम फेरीसाठी सार्थ निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
भारतातील सर्वात जुन्या किशोरवयीन स्पर्धेच्या २७ व्या अलीज क्लब मिस आणि मिस्टर टीन इंडिया २०२५ किशोरवयीन मुलांची
ब्युटी विथ ब्रेन स्पर्धा देशभरातील प्रतिभावान किशोरांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केली जाते.
यांमध्ये सांगोल्यातील १३ वर्षीय कु. अनन्या अमर शेंडे हिने उज्ज्वल आणि प्रतिभावान कामगिरी करत
सौंदर्य क्षेत्रातील नामवंत अलीज क्लब दिल्ली द्वारे २७ व्या मिस व मिस्टर टिन इंडिया स्पर्धेमध्ये गौरवास्पद कामगिरी करून अंतिम फेरीमध्ये अभिमानाने आपले स्थान मिळविले आहे.
ही स्पर्धा किशोरवयीन मुलांसाठी देशातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. न्यू इंग्लिश स्कुल सांगोला चे प्रतिनिधित्व करीत
कु.अनन्या हिने तिच्या दृढनिश्चय, आत्मविश्वास आणि मोहक व्यक्तिमत्त्वाद्वारे ही ओळख मिळविली आहे, ज्याने तिला या राष्ट्रीय व्यासपीठावर वेगळे स्थान मिळाले आहे.
सांगोल्यातील जेष्ठ शल्यचिकित्सक डॉ.अमर शेंडे आणि सौ.अंजली शेंडे यांची कु.अनन्या शेंडे ही कन्या आहे.
१९९७ मध्ये भारताची पहिली किशोरवयीन सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारी अले क्लब दिल्ली ही अग्रगण्य संस्था आहे.
भारतातील किशोर मुला मुलींसाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ म्हणून या स्पर्धेला लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड्समधील प्रतिष्ठित यादीद्वारे मान्यता प्राप्त आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून मॉडेलिंग, अभिनय आणि फॅशन करिअरचे दरवाजे सर्व किशोरवयीन मुला मुलींसाठी उघडत आहे.
या स्पर्धेच्या अंतीम फेरीमध्ये कु.अनन्या शेंडे हिची निवड झाल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे आणि अंतिम फेरीसाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सांगोलची कन्या कु. अनन्या हिला मिस इंडिया व्हीवर्स चॉईससाठी ALEE ANANYA.S हा मेसेज 57575 या नंबरला सेंड करून मतदान करा.
0 Comments