google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळा भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळा भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

सांगोला तालुक्यातील कोळा भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२ व्हाट्सअप नंबर ८२०८२८४६४७)

सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील कोळा परिसरातील राज्य सरकारकडून कर्जमाफी मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची  बँक खाती थकीत झाल्यामुळे ‘एनपिए’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 

परिणामी , त्यांच्यावर आधीचे कर्ज कायम असून नवीन पीक कर्जही मिळत नाही गेल्या काही महिन्यांत कर्जमाफीची अपेक्षा ठेवून हजारो शेतकऱ्यांनी पीककर्जाचे हप्ते भरलेले नाहीत . मात्र , सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस घोषणा

 न झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. कर्जमाफीही नाही आणि नव्या हंगामासाठी कर्जाचीही सोय नाही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत आवाज उठवला होता 

या गोष्टीकडे लक्ष देऊन गतिमान राज्य शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे कोळा जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते तुकाराम दादा आलदर यांनी केली आहे.

ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढे बोलताना म्हणाले शेतकऱ्यांना पुन्हा नियमित कर्जपात्रतेत आणण्यासाठी विविध बँका ‘पुनर्भरण योजना ‘ राबवत आहेत. 

या योजनेअंतर्गत थकीत रकमेचा एकरकमी भरणा केल्यास संबंधित खातं पुन्हा नियमित करण्यात येतं आणि नवीन कर्जासाठी पात्रता मिळते. पुनर्भरण योजनेचा लाभ घेतला. 

या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मंजूर झाले असून , त्यांनी हप्ते वेळेवर फेडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती बँक सूत्रांनी दिली. वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात या भागातील अनेक शेतकऱ्यांनी खाती एनपीए झाली आहेत.

 अनियमित पावसाळा, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारभावातील घसरण यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे. शेतकऱ्यांपुढील अडचणी सातबारा कोरा नाही, नवीन कर्जासाठी पात्रता नाही, पीकविमा रखडतो . शेतमालाला हमीभाव मिळत नाही.

 पूरक उद्योगांसाठीही निधी नाही. राज्य सरकारकडून लवकरात लवकर कर्जमाफीबाबत स्पष्टता न झाल्यास , शेतकऱ्यांचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे असे तुकाराम दादा आलदार यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments