google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध... बलवडी येथे मोजणी थांबवली..

Breaking News

सांगोला तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध... बलवडी येथे मोजणी थांबवली..

सांगोला तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध... बलवडी येथे मोजणी थांबवली..



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२ व्हाट्सअप नंबर ८२०८२८४६४७)

सांगोला प्रतिनिधी शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एक जिद्द शक्तिपीठ रद्द असे म्हणत बलवडी ता. सांगोला येथे शेतकरी वर्गाने एकत्र येऊन शक्तिपीठ महामार्ग मोजणी रोखली.

 शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, विहीरी, बोरवेल, पाईपलाईन जाणार असल्याने आम्ही शेतकरी देशोधडीला लागणार आहे व त्यामुळे आमची शेती शक्तिपीठ महामार्गास द्यावयाची नाही

 असे शेतकरी तमा उर्फ सिद्धगौडा पाटील यांनी सांगितले. तर येथून चार किलोमीटर अंतरावर पर्यायी महामार्ग असताना व या महामार्गाची शेतकऱ्यांनी मागणी केलेली नसताना शासन कशासाठी हा अट्टाहास करते आहे हे समजत नाही 

त्यामुळे शक्तीपीठ महामार्गास आमचा विरोध आहे व आमचे नुकसान करू नका अशी कळकळीची विनंती शासनास आहे असे शेतकरी पोपट गुरव यांनी सांगितले. तर शेतकरी वर्गांची एकजूट आहे, 

आमची शेती व आमची माती आमच्यापासून महाराष्ट्र सरकारने हिरावून घेऊ नये ही आमची विनंती आहे असे डॉक्टर हरिश्चंद्र सोनवणे यांनी सांगितले. शक्तीपीठ महामार्गाची सीमांकन प्रक्रिया सोमवार 4 ऑगस्ट रोजी बलवडी येथे 

भूमि अभिलेख, महसूल, कृषी आदी विभागाचे पथक संयुक्त मोजणी झाले परंतु बाधित शेतकरी दादासो वाघमोडे व इतर बाधित शेतकऱ्यांनी विरोध केल्याने सीमांकनास आलेले पथक माघारी परतले. 

       शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध असून, अधिकारी वर्गाने बळजबरी करू नये व कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, शेतकरी वर्ग एकजुटीने रहा व संघर्ष तयार रहा 

अशी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष एडवोकेट सचिन देशमुख यांनी यावेळी दिला. सदर प्रसंगी सचिव एडवोकेट शरद यादव, बाधित शेतकरी वसंतराव चौगुले,

 ऋषिकेश धायगुडे, राजाराम धायगुडे, समाधान धायगुडे, अंबादास शिंदे, तुकाराम कुंभार, विनायक चव्हाण, लक्ष्मण कवडे, प्रमोद कवडे, विजय भुसारी, दत्तात्रय पाटील, शिवाजी चौगुले, 

बसवेश्वर जोंधळे, सुनील चव्हाण, नामदेव सरगर, दत्तात्रय देशपांडे, संजय बनसोडे, संजय भंडारे, नारायण मिसाळ, राजू पाटील, सुहास काका देशपांडे, गुरुलिंग पाटील , सोमा पाटील व इतर शेतकरी बहुसंख्येने हजर होते.

Post a Comment

0 Comments