google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोनंद येथे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन संपन्न...

Breaking News

सोनंद येथे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन संपन्न...

सोनंद येथे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन संपन्न...


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ८२०८२८४६४७/९५०३४८७८१२ सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला नंबर जॉईन करा)

सांगोला प्रतिनिधी श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्त महाराज यांचे वास्तव्य मोराळ येथे आहे. व तिथे देवाचा संवाद होतो व यासाठी मोराळ ला एक वेळ भेट द्या 

व तेथील नियोजित भव्य दिव्य असे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचे मंदिर सात्विक भक्तांच्या सहकार्याने उभारणार आहे तरी त्यासाठी सर्व भक्तांनी सहकार्य करा असे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सोनंद ता. सांगोला येथे प्रबोधनात आवाहन केले. 

        शिवदत्त महाराजांचा महिमा त्यांची आरती सुरू झाल्यावर सर्वांना प्रत्यय आला त्यामुळे शिवदत्त दत्तरूपीच आहेत तसेच आत्महत्या करू नका आपले प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी संतोष उर्फ बंडू दादा यांची वेळ मागून घेऊन 

अडचण सोडवा. सध्या जगात सुखी असा कोणी नाही व पायात पाय घालणारी माणसे ही आपलीच आहेत व यातून आसूरी शक्तीचा त्रास होत आहे व त्यामुळे न डगमगता व नावे न ठेवता, 

संकट कोणतेही असू द्या ते भक्ती मार्गाने दूर होईल व संकटातून श्रीदत्त गुरु बाहेर काढतील कारण ब्रह्मा, विष्णू, महेश अशा तिन्हींचा अवतार दत्त महाराज आहेत परंतु भक्ती करताना मांसाहार व व्यसनापासून दूर राहा.

 व सध्या मनी नाही भाव आणि देवा मला पाव तर देव काय बाजारचा भाजीपाला आहे का तर यासाठी परमेश्वराची भक्ती करताना निष्ठेने करा म्हणजे जिथे भाव आहे तिथे देव आहे व भक्ती करताना

 गुरुचरित्र कथासार, राम विजय किंवा इतर ग्रंथाचा अभ्यास करा व श्री दत्तगुरूची निष्ठेने भक्ती करा आयुष्यात काही कमी पडणार नाही असे गुरुवर्य भालचंद्र पाटील काकांनी प्रबोधनात सांगितले. 

    सदर प्रसंगी सेवेकरी रत्न जय भिंगे, पंढरीनाथ आगलावे, अक्षय चिंचणे, डॉ. अण्णासो कोठावळे, बाळासो साळुंखे, उमेश काशीद, बापूसाहेब आग लावे, शिक्षक संतोष कांबळे, विजय भिंगे, संतोष गायकवाड, नवनाथ फडतरे, 

बंडू चव्हाण, अभिजीत ढगे, सचिन जाधव, बालम भोसले, निलेश माळी, मधुकर काशीद तसेच अन्नदान अमृतराव गायकवाड यांनी केले, महिला, नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments