google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. सांगोला शहरातील श्री गणेश उत्सव आगमन व समर्थ सदगुरु श्री गजानन महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय भव्य" तबलावादन स्पर्धा - मा. सोमेश यावलकर

Breaking News

मोठी बातमी.. सांगोला शहरातील श्री गणेश उत्सव आगमन व समर्थ सदगुरु श्री गजानन महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय भव्य" तबलावादन स्पर्धा - मा. सोमेश यावलकर

मोठी बातमी.. सांगोला शहरातील

श्री गणेश उत्सव आगमन व समर्थ सदगुरु

श्री गजानन महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय भव्य" तबलावादन स्पर्धा - मा. सोमेश यावलकर

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला (प्रतिनिधी)-श्री गणेश उत्सव आगमन व समर्थ सदगुरु श्री गजानन महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय भव्य" 

तबलावादन स्पर्धा आयोजित केल्याची माहिती शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख, नगरसेवक मा. सोमेश यावलकर यांनी दिली आहे.

    १ ला गट (पाचवी ते आठवी)

प्रथम क्रमांक बक्षीस  ७,००१/- ,

द्वितीय क्रमांक बक्षीस  ५,००१/-

तृतीय क्रमांक बक्षीस ३,००१/-,

२रा गट (नववी ते बारावी)

प्रथम क्रमांक  बक्षीस ७,००१/-

द्वितीय क्रमांक बक्षीस ५,००१/-,

तृतीय क्रमांक बक्षीस ३,००१/-,

३ रा गट (खुला)

प्रथम क्रमांक बक्षीस ७,००१/-

द्वितीय क्रमांक ५,००१/-,

तृतीय क्रमांक बक्षीस ३,००१/-देण्यात येणार आहे.

          स्पर्धेचे नियम व अटी

या तबलावादन स्पर्धेत ज्या स्पर्धकाचा नंबर नाही आला तरीही त्या स्पर्धकास सहभागी सर्टिफिकेट व १,०००/- प्रोत्साहन पर बक्षीस दिले जाईल.

१) इयत्ता पाचवी ते आठवी या गटास पाच ते सात मिनिटे वेळ राहील.

२) इयत्ता नववी ते बारावी सात ते दहा मिनिटे व खुला गट यांच्यासाठी बारा ते पंधरा मिनिटे वेळ राहील.

३) सर्व स्पर्धकांनी तबला व आपापले लेहरा वाद्य (मशीन) किंवा हार्मोनियम साथीदार स्वतः आणावा.

४) इयत्ता नववी ते बारावी व खुला गट यांनी आपले वादक हार्मोनियम किंवा लेहरा यंत्राबरोबरच सुरू करावे.

५) स्पर्धाही सकाळी १० वाजता सुरू होईल तरी सर्व स्पर्धकांनी पाच ते दहा मिनिटे अगोदर उपस्थित असणे गरजेचे आहे. 

६) परीक्षकांच्या निर्णयात आयोजक अगर कोणीही स्पर्धक, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक किंवा इतर कोणीही हस्तक्षेप करणार नाही. 

७) परीक्षकांचा निर्णय हा आयोजक व स्पर्धक यांनाअंतिम राहील.

नाव नोंदणी - गुरुवार दिनांक २८/०८/२०२५ सायं. ५ वाजेपर्यंतच ग्राह्य धरली जाईल.

नाव नोंदणी संपर्क- श्री. अतुल उकळे - 9881517093 श्री. गणेश भंडारे - 9503903601

शुक्रवार दिनांक २९/०८/२०२५ रोजी सकाळी १० वाजता स्थळ : श्री दत्तमंदिर, महादेवगल्ली, सांगोला

संयोजक : मा. सोमेश यावलकर मा. नगरसेवक (शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख).

Post a Comment

0 Comments