खळबळजनक..एकाच व्यक्तीसोबत दोघींचे प्रेमसंबंध, मैत्रिणीनेच महिला होमगार्डची केली हत्या, मृतदेह बॉक्समध्ये भरला अन्.,
होमगार्ड महिलेला संपवलं, मैत्रिणीचा खरा चेहरा जगासमोर, शेवटच्या त्या व्हिडिओमुळं झाला पर्दाफाश
बीडमधील होमगार्ड अयोध्या व्हरकटे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अयोध्या व्हरकटेची तिच्याच मैत्रिणीने हत्या केली.
दोन दिवसांपूर्वी अयोध्याची मैत्रीण वृंदावनी फरताळेने हत्या केली होती. दोन्ही महिलांचे एकाच व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. यातूनच अयोध्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
अयोध्या व्हरकटेची हत्या करून तिचा मृतदेह एका बॉक्समध्ये घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपींनी शेजारी राहणाऱ्या महिलेची दुचाकी इतर साहित्य न्यायचे आहे
असे सांगून घेतली आणि त्याच दुचाकीवरून अयोध्याचा मृतदेह घेऊन जाऊन तो उमरद जहाँगीर परिसरात फेकून देण्यात आला. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
आयोध्या राहुल व्हरकटे (वय २७ वर्षे) ही होमगार्ड म्हणून कार्यरत होती. ती काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता.
अशातच गुरूवारी सकाळी बीड तालुक्यातील पांगरी गावाच्या पुढे एका नाल्यात तिचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
शवविच्छेदन अहवालामध्ये तिची हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली असता चौकशीमधून वृंदावनी फरताळेने अयोध्याची हत्या केल्याची कबुली दिली.
अयोध्या आणि वृंदावनी या दोघी एकाच गावात राहणाऱ्या होत्या आणि मैत्रिणी होत्या. त्यांचे एकाच तरुणासोबत प्रेम होते यातूनच वृंदावनीने अयोध्याची हत्या केल्याचे उघड झाले.
0 Comments