google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठा आरक्षणासाठी मुंबईतील मोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी सांगोला तालुक्यात अखंड मराठा समाजाची पूर्वनियोजन बैठक

Breaking News

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील मोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी सांगोला तालुक्यात अखंड मराठा समाजाची पूर्वनियोजन बैठक

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील मोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी सांगोला तालुक्यात अखंड मराठा समाजाची पूर्वनियोजन बैठक



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ८२०८२८४६४७/९५०३४८७८१२)

सांगोला /करण मोरे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या चळवळीला अधिक बळ देण्यासाठी

 अखंड मराठा समाज, सांगोला तालुक्याच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पूर्वनियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 ही बैठक रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी बरोबर १ वाजता, सदानंद मल्टीपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला येथे पार पडणार आहे.

२९ ऑगस्ट रोजी मुंबई महानगरात होणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चासाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार असून, सांगोला तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बैठकीस उपस्थित राहून प्रत्येकाने मोर्च्याच्या यशस्वी आयोजनासाठी आपापली जबाबदारी पार पाडावी, 

अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत असून, 

आता निर्णायक टप्प्यावर ही लढाई आली असल्याने “घरात बसला तो मराठा कसला” हा घोषणा-वाक्य बैठकीदरम्यान ठळकपणे देण्यात आला आहे.

आत्तापर्यंत मराठा समाजाने विविध निवडणुकांत राजकीय शक्ती दाखवली, परंतु आता समाजाच्या अस्तित्व व भविष्यासाठी आरक्षणाची लढाई अधिक महत्वाची असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस सांगोला तालुक्यातील सर्व गावांमधील मराठा बांधवांनी उपस्थित राहून समाजाची एकजूट दाखवावी व मुंबई मोर्चाला भव्य स्वरूप देण्यासाठी योगदान द्यावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे

Post a Comment

0 Comments