google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! मंगळवेढ्यासह 'या' सांगोला तालुक्यात गूढ आवाज; खिडक्या, दरवाजे हादरले; नागरिक घराबाहेर पळाले

Breaking News

खळबळजनक! मंगळवेढ्यासह 'या' सांगोला तालुक्यात गूढ आवाज; खिडक्या, दरवाजे हादरले; नागरिक घराबाहेर पळाले

खळबळजनक! मंगळवेढ्यासह 'या' सांगोला तालुक्यात गूढ आवाज;


खिडक्या, दरवाजे हादरले; नागरिक घराबाहेर पळाले

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

मंगळवेढा:- शुक्रवारी सकाळी एका गूढ आवाजाने मंगळवेढा आणि आसपासचा परिसर हादरला. या आवाजामुळे परिसरातील अनेक घरांच्या खिडक्या, दरवाजे आणि तावदाने जोरजोरात हादरले.

या आवाजाने सर्वसामान्यात घबराट निर्माण झाला.

हा गूढ आवाज सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी ऐकू आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. आवाजाची तीव्रता इतकी होती की, जमिनीखाली काहीतरी मोठा स्फोट झाल्यासारखे जाणवले.

या आवाजासोबतच घरात ठेवलेल्या वस्तू आणि भांड्यांचाही आवाज झाला. काही मिनिटे हा आवाज सुरू होता आणि त्यानंतर सर्व शांत झाले. नागरिकांनी या घटनेनंतर लगेचच सोशल मीडियावर याबाबत माहिती शेअर केली.

हा आवाज सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा व नातेपुते परिसरात आला असून ज्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या गूढ आवाजाचे कारण जाणून घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लवकरच पावले उचलली गेल्याचे सांगितले गेले.

मंगळवेढ्यात नागरिक घराबाहेर पळाले

शुक्रवारी सकाळी नऊ वाजून एक मिनिटाने भूगर्भात अचानक मोठा आवाज झाला. यावेळी खिडक्या, दरवाजे व घरे जोरदार हादरली. 

या आवाजाने तालुक्यात कुठेही हानी झाली नाही. हा आवाज कशाचा, याबाबत पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याकडे कोणतीही माहिती आली नाही.

या आवाजाने गेल्या एक-दोन वर्षांमध्ये कधीही दरवाजे, खिडक्या व घरं हादरली नाहीत; पण आजच्या या आवाजाने घरांचे दरवाजे, पत्रा शेड यांचा जोरदार आवाज झाला.

५० कि.मी.पर्यंत गेला आवाज

गूढ आवाजामुळे शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आंधळगाव व लक्ष्मी दहिवडी परिसर हादरून गेला. या आवाजाची तीव्रता इतकी होती की तो आवाज ५० ते ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्येही स्पष्ट ऐकू आला.

वैज्ञानिकांनी सांगितले, भूकंपाचा केंद्रबिंदू

सांगोला तालुक्यातील बहुतांश गावे शुक्रवारी सकाळी ९:०३ च्या सुमारास प्रचंड मोठ्या गुढ आवाजाने हादरली. भयभीत महिला, नागरिकांनी घराबाहेर पळत आली. 

सांगोला शहरापासून ५ किमी अंतरावर अॅग्रो टुरिझम हे भूकंपाचा केंद्रबिंदू तयार झाल्याचे यापूर्वी भूजल वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी सांगितले होते. तरीही शहराबरोबरच ग्रामीण भागात प्रचंड गुढ आवाज होण्याच्या घटना ऐकू येतच आहेत.

आवाजा बद्दल कसलीही अधिकृतमाहिती मिळाली नाही

या आवाजामुळे अनेक नागरिक घराबाहेर पळाले. या आवाजामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 

सकाळी नऊदरम्यान जोराचा आवाज झाला; परंतु या आवाजाबद्दल कसलीही अधिकृत माहिती मिळाली नाही.-मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा

Post a Comment

0 Comments