google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला वन विभागाकडून जाहीर आवाहन वनविभाग सांगोला मौजे एखतपूर, धायटी, चिंचोली या गावच्या परिसरात वन्यप्राणी लांडग्याने आतापर्यंत एकूण नऊ लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याने जनजागृती करण्याचे आव्हान ..मा.एस. व्ही. मगर) वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) सांगोला

Breaking News

सांगोला वन विभागाकडून जाहीर आवाहन वनविभाग सांगोला मौजे एखतपूर, धायटी, चिंचोली या गावच्या परिसरात वन्यप्राणी लांडग्याने आतापर्यंत एकूण नऊ लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याने जनजागृती करण्याचे आव्हान ..मा.एस. व्ही. मगर) वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) सांगोला

सांगोला वन विभागाकडून जाहीर आवाहन वनविभाग सांगोला मौजे एखतपूर, धायटी, चिंचोली या गावच्या परिसरात वन्यप्राणी लांडग्याने


आतापर्यंत एकूण नऊ लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याने जनजागृती करण्याचे आव्हान ..मा.एस. व्ही. मगर) 
वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) सांगोला

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ८२०८२८४६४७/९५०३४८७८१२)

मौजे एखतपूर, धायटी, चिंचोली या आसपासच्या भागात दि.22.08.2025 पासून लांडगा या वन्यप्राण्याने आतापर्यंत एकूण नऊ लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे. 

वनअधिकारी यांनी सर्व घटना स्थळांना व जखमींना भेट दिली असून सध्या जखमींची प्रकृती स्थौर आहे. जखमींचे पंचनामा, जबाब घेणेत आलेले आहेत. तसेच जखमींना उपचाराबाबत मार्गदर्शन केलेले आहे.

 जखमींना पुढील उपचारा करिता सांगोला व सोलापूर या ठिकाणी पाठविण्यात आलेले असून जखमींना योग्य ती शासकिय मदत मिळणेबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. 

तसेच सदर भागात दिवसा व रात्री गस्त घालण्याकरिता, मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता व सदर प्राण्यास पकडण्यासाठी वन्यजीव बचाव पथक सोलापूर व वन्यजीव बचाव पथक पुणे हे सांगोला येथे दाखल झाले आहेत.

 तरी सर्व ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचेकडून करण्यात येत आहे. संवेदनशील परिसंरात वावरताना ग्रामस्थांनी घ्यावयाची खबरदारी पुढीलप्रमाणे......

1) रात्री अपरात्री एकट्‌याने घराबाहेर पडणे टाळा. लांडगा वन्यप्राणी सकाळ व सायंकाळच्या वेळी जास्त सक्रीय असतो.

2) घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास तीन किंवा चार जणांचा गट करून घराबाहेर पड़ा. सोबत बॅटरी व काठी ठेवा.

3) रात्रीच्या वेळी लहान मुलांना व वृध्दांना एकटे सोडू नका. त्यांची विशेष खबरदारी बाळगा.

4) रात्रीच्या वेळी घराबाहेर अंगणात उघड्‌यावर झोपू नका.

5) पाळीव प्राण्यांना बंदीस्त व सुरक्षीत ठिकाणी ठेवा.

6) अचानक लांडग्याशी सामना झाल्यास त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका. घाबरून जावू नका. मोठ-मोठ्यांने आवाज करा.

7) लांडगा सदृश्य वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधा.

वन्यप्राणी तरस, लांडगा, कोल्हा, ससा, काळविट, हरिण व इतर वन्यप्राणी एखा‌द्या गावात किंवा वस्तीवर जर आले 

तर त्यास कोणत्या प्रकारचा त्रास न देता ताबडतोब वनविभाग सांगोला यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक.

 1) श्री.एस.व्ही. मगर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला 8788605476

 2) श्री. जे. जे. खोंदे-वनपाल सांगोला 9272726251 

3) श्री.एस.एल. वाघमोडे वनपाल जुनोनी 9767344883 

4) श्री.एस.यु. जाधवर वनपाल कोळा 7775070285

 5) श्री. के. एन. जगताप वनरक्षक महूद बुः। व सांगोला 9309155905 या वरील फोन नंबर वर संपर्क साधावा. 

लोकांना आवाहन करण्यात येते की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे संरक्षण करणे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

मा. कुलराज सिंग, उपवनसंरक्षक सो, वनविभाग सोलापूर, मा. ऐश्वर्या शिंदे, मा. सहा. वनसंरक्षक, वनविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली

 वनपरिक्षेत्र सांगोला यांचे मार्फत सदर वन्यप्राणी शोध मोहिम सुरू असुन नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वनविभागास सहकार्य करावे,

(एस. व्ही. मगर)

वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) सांगोला

Post a Comment

0 Comments