google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन गुलजार मित्र परिवाराचा जिलबी वाटप उपक्रम संपन्न

Breaking News

सांगोला शहरात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन गुलजार मित्र परिवाराचा जिलबी वाटप उपक्रम संपन्न

सांगोला शहरात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन गुलजार मित्र परिवाराचा जिलबी वाटप उपक्रम संपन्न 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला प्रतिनिधी : गेल्या पंधरा वर्षांपासून गुलजार मित्र परिवार दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. या परंपरेचा एक भाग म्हणून, यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी 

सांगोला बसस्थानक येथे जिलबी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशभक्तीचा जयघोष आणि आनंदमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांना प्रेमपूर्वक जिलबी वाटून स्वातंत्र्यदिनाचा आनंद वाटून घेतला गेला. 

        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आगर प्रमुख विकास पोकळे साहेब, माजी नगरसेवक हाजी रफिक भाई तांबोळी, स्थानक प्रमुख पंकज तोंडे, वाहतूक नियंत्रक प्रशांत चंदनशिवे, तसेच दीपक जाधव, संग्राम गायकवाड, 

राजेंद्र गुळमिरे, रमेश जाधव, राजू मगर, आलमगीर मुल्ला, शहाबाज तांबोळी, सतीश खडतरे, नरेंद्र होनराव, शरद बनकर, मिलिंद भंडारे, संदीप कोळेकर, समीर नदाफ, निहाल तांबोळी, शाहरुख तांबोळी, 

परवेज बागवान, रफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुलजार ग्रुपचे सर्फराज तांबोळी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments