मोठी बातमी...नुतन उपविभागीय पाेलीस आधिकारी म्हणून
डॉ.बसवराज शिवपुजे यांनी घेतला पदभार; मंगळवेढ्यातील जुगार अड्डे, अवैध वाळू, दारू रोखण्याचे असणार आवाहन
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.
दरम्यान तत्कालीन डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांची बदली झाल्याने येथील जागा रिक्त झाली होती.
महाराष्ट्र शासन गृहविभागाने पोलीस खात्यातील अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये विद्यमान डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड यांची बदली अन्यत्र झाल्याने त्यांच्या जागी
श्रीरामपूर येथून डी.वाय.एस.पी.डॉ.बसवराज शिवपुजे हे आले असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
डी.वाय.एस.पी. गायकवाड यांच्या बदलीचा अर्ज प्राप्त होताच ते अन्य बदलीच्या ठिकाणी गेल्याने येथील कार्यभार पंढरपूरचे डी.वाय.एस.पी.प्रशांत डगळे यांच्याकडे होता. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुतन डी.वाय.एस.पी.डॉ.शिवपुजे यांच्याकडे दिला.
डी.वाय.एस.पी.डॉ.शिवपुजे यांनी पदभार घेतल्यानंतर डी.वाय.एस.पी. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेवून कामकाजाबाबत आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.
डॉ.शिवपुजे हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी आत्तापर्यंत गडचिरोली,ठाणे, अकलूज आदी ठिकाणी आपली सेवा बजावली आहे.
मंगळवेढ्यात वाढते अवैध धंदे रोखणे त्यांना एक आव्हान असून मागील दोन अडीच वर्षात डी.वाय.एस.पी. कार्यालयाकडून एकही पोलीस पथक अवैध धंद्याच्या कारवाईसाठी
न नेमल्यामुळे अवैध धंदे बाेकाळले आसुन अवैद्य धंद्यावर अंकुश राहिला नसल्याची चर्चा तालुका भर नागरीकामधून होत आहे.
0 Comments