१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन जिल्हा परिषद प्राथ. शाळा केदारवाडी-वासुद
येथे उत्साहात साजरा, गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
प्रतिनिधी : दि १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केदारवाडी-वासुद येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल भागवत केदार , डॉ.अजिंक्य अरविंद केदार,उपाध्यक्ष सोमनाथ उत्तम केदार ,डॉ.निरंजन केदार आणि मान्यवरांनी ध्वजारोहण केले .
शाळेतील सर्व मुलांनी देशभक्ती गीतांची म्यूझिक कवायत सादर केली . याप्रसंगी सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष व आपुलकी प्रतिष्ठान चे सक्रिय सदस्य
शिवश्री.अरविंद केदार यांनी स्वतः स्वखर्चातुन केदारवाडी शाळेतील गरजू विद्यार्थी कु.समर्थ सतिश केदार यास डॉ अजिंक्य अरविंद केदार आणि मान्यवरांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली .
दुसरी सायकल श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळीं,धायटी चे अध्यक्ष व सांगोल्यातील प्रसिद्ध डॉ.शिवराज भोसले यांनी केदारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,केदारवाडी- वासुद येथील गरजू विद्यार्थीनी कुमारी.
परि सोमनाथ केदार हिला डॉ. निरंजन केदार आणि मान्यवरांच्या हस्ते सायकल भेट दिली . डॉ निरंजन केदार आणि डॉ अजिंक्य केदार यांनी शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले आणि म्यूझिक कवायत, भाषणे यांचे कौतूक केले .
यावेळी विचार मंचावर मुख्याध्यापिका श्रीमती विद्या शंकर धोकटे आणि उपशिक्षक रविंद्र तुकाराम कदम तसेच लताताई बाबर या अंगणवाडी ताई उपस्थित होत्या .मान्यवरांनी मुलांना खाऊ वाटप केले आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाली .
0 Comments