खळबळजनक..सोने , गाडीसाठी विवाहितेचा छळ , नवऱ्यासह चौघावर सांगोला पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
माहेरकडून खर्चासाठी पैसे , सोने व गाडी घेऊन ये , असे म्हणत शिवीगाळ करून मानसिक छळ केल्याप्रकरणी पीडित महिलेने सासू, सासरा ,
दीर यांच्यासह पतीवर गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित महिलेने सासरच्या चौघाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सांगोला पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी चांदणी नंदकिशोर साळवे (वय 30) सध्या रा. कटफळ, ता. सांगोला हिला फेब्रुवारी 2023 ते दि. 1 जुलै 2025 पर्यंत
फिर्यादीच्या सासरचे लोक नवरा नंदकिशोर प्रकाश साळवे , सासू शालिनी प्रकाश साळवे , सासरा प्रकाश गबाजी साळवे , दीर विशाल प्रकाश साळवे (रा- साकोरी टिबल्ये ,
ता. जुन्नर , जि .पुणे ) यांनी फिर्यादी महिलेस आम्हाला तू घरी खर्चासाठी पैसे दे, तुझे माहेरकडून सोने आणि गाडी घेऊन ये, असे म्हणून तगादा लावला. तसेच घरगुती कारणावरून फिर्यादीस वेळोवेळी शिवीगाळ ,
दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीस शारीरिक व मानसिक छळ केला.
याबाबत फिर्यादी महिलेने वरील चौघाविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. ना . लेंगरे हे करीत आहेत.
0 Comments