खळबळजनक घटना! कमी किमतीमध्ये सोने खरेदीचा मोफ
एका महिलेला चांगलाच आला अंगलट; मंगळवेढ्यात धमकी देऊन 2 लाख लुटले;
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
मंगळवेढा:- महिला हॉटेल चालकासह दोघांना लुटले
कमी किमती मध्ये सोने खरेदी करायचा मोफ एका महिलेला चांगलाच अंगलट आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
कमी दरात सोने देतो म्हणून जत येथील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या महिलेला एका ठिकाणी बोलवून मारहाण करण्याची भीती दाखवुन २ लाख २५ हजार लुटल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी गावाजवळ घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी महिला ही सांगली जिल्ह्यातील जत शहरातील हॉटेल व्यवसायिक आहे.
हॉटेलत कामास येत असलेल्या महिलाच्या नात्यातील गुड्डू नावाच्या मुलाशी ओळख झाली. गुड्डू याने कमी दरात सोने हवे असेल तर घेऊन देतो असे सांगून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला.
दि.९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वा. सुमारास गुड्डूने फिर्यादी महिलेस मरवडेजवळ नेले. त्या ठिकाणी एक महिला व एक पुरुष येऊन थांबवले होते. त्यांनी एक सोन्याचा तुकडा फिर्यादीला दिला व तपासून घेण्यासाठी सांगितले
फिर्यादीने तो तुकडा जत येथील सोनाराकडे जाऊन तपासून घेतला, त्या सोनाराने २२ कॅरेट असल्याचे सांगितल्यानंतर खात्री पटली.
त्यानंतर फिर्यादी महिला महिलेने स्वतःकडील सोने गहाण ठेवून व इतरांकडून एकूण २ लाख रुपये घेऊन दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा दीर प्रथमेश हांडे यांच्यासह सोने घेण्यासाठी भालेवाडी गावाजवळ गेले.
तेव्हा फिर्यादी व दीराकडील २ लाख रुपये जबरदस्तीने घेतले तसेच हातातील चांदीचे ब्रासलेट व १० हजार रुपये
किमतीची गळ्यातील चांदीची चैन असा एकुण २ लाख २५ हजार रुपयांचे मुद्देमाल जबरीने मारहाण काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करीत आहेत.
0 Comments