google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना! 'तरुण दाम्पत्याला कारने उडवले'; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरील घटना

Breaking News

धक्कादायक घटना! 'तरुण दाम्पत्याला कारने उडवले'; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरील घटना

धक्कादायक घटना! 'तरुण दाम्पत्याला कारने उडवले'; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरील घटना


सोलापूर : भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकी वरील दाम्पत्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. 

या धडकेमुळे दुचाकी वरील दाम्पत्य समोर जात असलेल्या आयशर टेम्पो खाली गेले. या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली.

सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर हा अपघात घडला. चेतन अवताडे (वय २४) असे मृताचे नाव आहे.

विरवडे बुद्रुक (ता. मोहोळ) येथील रहिवासी चेतन अवताडे व त्यांच्या पत्नी कल्याणी अवताडे या 

सांगोला येथील अवताडे यांच्या सासरवाडी असलेल्या जवळा येथे गेले होते. सोमवारी सकाळी ते परत येत असताना वाघोली गावाजवळ

 कोल्हापूरकडून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या कारने (एम एच -०१ ए एच ४४७२) पाठीमागून जोराची धडक दिली.

 या धडकेमुळे समोरच्या टेम्पोला दुचाकीची धडक झाली. डोक्याला मार लागल्याने चेतन यांचा मृत्यू झाला.

दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी कल्याणी याही गंभीर जखमी झाल्या. त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कल्याणी यांची स्थिती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबांनी दिली.

चेतन अवताडे हे वाघोली येथील श्रीकृष्ण गुरुकुल मध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.

 श्रीकृष्ण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे यांचे ते चुलत भाऊ होते. चेतन यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन विवाहित बहिणी आहेत.

Post a Comment

0 Comments