google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एन.टी.व्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा १२ ऑगस्टला; नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्वी सोहळा

Breaking News

एन.टी.व्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा १२ ऑगस्टला; नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्वी सोहळा

एन.टी.व्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा १२ ऑगस्टला; नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्वी सोहळा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

अहमदनगर – डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या एन.टी.व्ही. न्यूज मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन

 आणि ‘शाही पुरस्कार’ सोहळा यंदा विशेष दिमाखात पार पडणार आहे. १२ ऑगस्ट २०२५, मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता,

 अहमदनगर येथील हॉटेल व्ही-स्टार (तारकपूर बस स्टँड शेजारी) येथे हा भव्य कार्यक्रम होणार असून, जिल्हाभरातील तसेच राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीने तो ऐतिहासिक ठरणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने भूषवणार आहेत. उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे शिंदे यांच्या शुभहस्ते सोहळ्याला प्रारंभ होईल. 

प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्य, ग्रामीण विकास आणि आदर्श गाव संकल्पनेत उल्लेखनीय योगदान देणारे पद्मश्री पोपटराव पवार (कार्याध्यक्ष – महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजना व प्रकल्प समिती) उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय, आ. संग्राम जगताप (अ.नगर शहर), सोमनाथ घार्गे (पोलिस अधीक्षक), गणेश राठोड (उपजिल्हाधिकारी), ॲड. सुभाष काकडे (जेष्ठ विधीज्ञ, अहिल्यानगर न्यायालय), विकास भोसले (DD News रिपोर्टर, सातारा) 

आणि सतीश सावंत (संपादक – दै. माणदेश नगरी, सोलापूर) यांसारखे विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवतील.

‘शाही पुरस्कार’ हा केवळ एक पुरस्कार नसून, आपल्या क्षेत्रात नवनिर्मिती, प्रामाणिकपणा, समाजासाठी कार्य आणि योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा एक विशेष उपक्रम आहे. 

यावर्षी पत्रकारिता, सामाजिक कार्य, न्यायव्यवस्था, पोलिस प्रशासन, ग्रामीण विकास, तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

एन.टी.व्ही. न्यूज मराठी चे संपादक इक्बाल शेख यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांनी समाजात घडामोडी पोहचवण्याची गती आणि पारदर्शकता वाढवली आहे. 

या प्रवासात एन.टी.व्ही. न्यूज मराठीने सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य निष्ठेने केले आहे. ‘शाही पुरस्कार’ सोहळा हा त्या कार्याचा सन्मान करणारा सोहळा आहे.”

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती, साहित्यिक,

 आणि विविध क्षेत्रांतील रसिकांमध्ये उत्सुकता आहे. या दिवशी केवळ पुरस्कार सोहळाच नव्हे, तर प्रेरणादायी भाषणे, अनुभवकथन, आणि समाजकार्याच्या नव्या दिशा यांचा देखील समावेश असेल.

एन.टी.व्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा हा आगामी काळात जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात एक सुवर्ण पान ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments