google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निरा उजवा कालव्याचे पाणी फाटा क्र. ५ ला सोडून चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार- मा.आम. ॲड. शहाजीबापू पाटील

Breaking News

निरा उजवा कालव्याचे पाणी फाटा क्र. ५ ला सोडून चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार- मा.आम. ॲड. शहाजीबापू पाटील

निरा उजवा कालव्याचे पाणी फाटा क्र. ५ ला सोडून चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार- मा.आम. ॲड. शहाजीबापू पाटील


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ८२०८२८४६४७/९५०३४८७८१२)

सांगोला /प्रतिनिधी: राज्याचे जलसंपदा मंत्री नाम. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामु‌ळे निरा उजवा- कालवा फाटा क्र.५ ला २२५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून येत्या पाच ते सहा दिवसात 

फाटा क्रमांक ५ च्या लाभ क्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यतच्या गावाला पाणी पोहचणार आहे. त्यानंतर चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती माजी आम. ॲड.शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.

सध्या निरा व देवघर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे. 

त्यामुळे निरा -उजवा कालव्यातून फाटा क्र ५ ला पाणी सोडण्यात यावे व चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी तात्काळ फाटा क्रमांक ५ ला पाणी सोडून योजनेतील शेवटच्या गावापर्यंत 

पाणी सोडावे तसेच चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आदेश दिल्याने रविवार दि. २७ जुलैपासून फाटा क्र. ५ ला २२५

क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Post a Comment

0 Comments