मोठी बातमी..केदारवाडी-वासुद येथे वासूद या गावासाठी आरोग्य उपकेंद्र मंजूर होणेबाबत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची आरोग्यमंत्री यांचेकडे मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) : मौजे वासुद -केदारवाडी हे गांव सद्यस्थितीला आरोग्य सुविधेकरीता आरोग्य उपकेंद्र,कमलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र,अकोला अंतर्गत जोडलेली
असून वासुद गावच्या नागरिकांना आरोग्य सुविधा,आरोग्य विभागातील शासकीय योजनांचा लाभ घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी जाणेकरिता आरोग्य उपकेंद्र , कमलापूर येथे जावे लागते.
उपकेंद्र कमलापूर येथे जाणेकरिता वासुद ते सांगोला व नंतर सांगोला ते कमलापूर असे जाऊन आरोग्य सुविधा घ्याव्या लागत आहेत
तसेच मौजे केदारवाडी – वासुद ते कमलापूर आरोग्य उपकेंद्र जाणारा हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून नागरिकांना ये-जा करण्यास खूपच अडचणी निर्माण होत आहेत.
मौजे वासुद- केदारवाडी या गावची संपूर्ण लोकसंख्या जवळपास ५००० इतकी असून ही नदीकाठची गावे असल्यामुळे जोखिमग्रस्त आहेत.
तरी वरील बाबींचा सकारात्मक विचार करून तात्काळ मौजे केदारवाडी-वासुद या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र मंजूर होऊन लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे
अश्या प्रकारचे निवेदन सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांचे अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर केले आहे.
0 Comments