google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कृष्णाईदिदी साळुंखे- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भोपसेवाडी विद्यालयाच्या वतीने मोफत सायकल वाटप संपन्न.

Breaking News

कृष्णाईदिदी साळुंखे- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भोपसेवाडी विद्यालयाच्या वतीने मोफत सायकल वाटप संपन्न.

कृष्णाईदिदी साळुंखे- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भोपसेवाडी विद्यालयाच्या वतीने मोफत सायकल वाटप संपन्न.


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी विद्या विकास मंडळ जवळा या संस्थेच्या मार्गदर्शिका आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कन्या

 कृष्णाईदीदी साळुंखे- पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोपसेवाडी विद्यालय भोपसेवाडी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. 

हा कार्यक्रम शनिवार दि १२ जुलै रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.जयमालाताई गायकवाड यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात भोपसेवाडी प्रशालेच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.  

जवळा आणि परिसरातून वाड्या–वस्त्यावरून गोरगरीब कुटुंबातील असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पायी प्रवास करून भोपसेवाडी प्रशालेत शिक्षण घेण्यासाठी येतात. 

अशा विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सायकल वाटप करण्याचा निर्णय प्रशालेच्या वतीने घेण्यात आला होता. 

सदर सायकल वाटप प्रसंगी विद्या विकास मंडळ जवळे या संस्थेचे सचिव सुभाष लऊळकर, सुचिता काकी मस्के, चाकण नगरपालिका प्रशासकीय 

अधिकारी विनायक साळुंखे,केंद्रप्रमुख सुहास कुलकर्णी,मुख्याध्यापक संजय पौळ, प्रशांत पाटील, श्रीराम सर, माळी सर, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग बचत गट महिला यांच्या विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments