google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे डाळींब मार्केट असूनही चिंचोली रोडवरच डाळिंब विक्रीचा लाखो रुपयांचा होतोय व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीला लाखोंचा आर्थिक फटका काय चाललय सांगोल्यात.! तरीही सांगोलेकर गप्प का?

Breaking News

सांगोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे डाळींब मार्केट असूनही चिंचोली रोडवरच डाळिंब विक्रीचा लाखो रुपयांचा होतोय व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीला लाखोंचा आर्थिक फटका काय चाललय सांगोल्यात.! तरीही सांगोलेकर गप्प का?

सांगोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे डाळींब मार्केट असूनही चिंचोली रोडवरच डाळिंब विक्रीचा लाखो


रुपयांचा होतोय व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीला लाखोंचा आर्थिक फटका काय चाललय सांगोल्यात.! तरीही सांगोलेकर गप्प का?

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/ करण मोरे: सांगोला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे डाळींब मार्केट कार्यरत असतानाही चिंचोली रोड परिसरात पिकअपमधून 

थेट डाळिंब लिलावाचे व्यवहार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना अधिकृत बाजार समिती असताना 

चिंचोली रोडच्या खाजगीरित्या डाळिंब विक्रीची गरज काय? चिंचोली रोड खाजगी डाळींब मार्केटमुळे बाजार समितीला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत असून, स्थानिक व्यापारी आणि दलालांच्या मर्जीने हे

 व्यवहार खुलेआम सुरू आहेत.दररोज सकाळपासून चिंचोली रोडवर असंख्य पिकअप उभ्या राहत असून, थेट शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये डाळिंबाचे व्यवहार केले जात आहेत. 

मार्केट यार्डात डाळिंबाची लिलाव पद्धत असूनही, या प्रकारामुळे नियमबाह्य व्यवहाराला चालना मिळत आहे. यामध्ये बाजार समितीचे कोणतेही शुल्क भरले जात नसून, सरकारच्या महसूल उत्पन्नावरही परिणाम होतो आहे.

शेतकऱ्यांची अडचण :- डाळिंबाचे दर मार्केट यार्डात कमी मिळतात, तर चिंचोली रोडवर थोडे अधिक दर मिळतात या आशेने अनेक शेतकरी थेट

 पिकपवर माल विकण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, या व्यवहारात दलालांचे वर्चस्व असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष:- संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने अशा गैरव्यवहारांना खुलेआम पाठबळ मिळत आहे. 

बाजार समिती, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. अशी मागणी शेतकरी व जागरूक नागरिकांनी केली आहे.

उपसंहार:-सांगोल्यासारख्या तालुक्यात अधिकृत मार्केट यार्ड असूनही रस्त्यावर लिलाव होणे ही व्यवस्थेची गंभीर त्रुटी असून, यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे. प्रशासनाने त्वरीत कारवाई करून या प्रकारांना आळा घालावा, 

अशी मागणी सध्या परिसरात होत आहे. डाळिंब खरेदी -विक्रीचे व्यवहार हे भर रस्त्यावर होत असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ,वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे .

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून या डाळींब मार्केटचा परिणाम वाहतुकीवर ही होत आहे. यामुळे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. याची वेळीच दखल घेतली जावी ही भूमिका शेतकऱ्यातून व नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments