मोठी बातमी..आम.डॉ.बाबासाहेबांमध्ये स्व.गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणेच तळमळ विधानसभेत
कंत्राटी कामगारांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नावर उठविला आवाज
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला(प्रतिनिधी):- शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यातही सर्वसामान्यांबद्दलची तीच तळमळ दिसून येत आहे.
भाई.गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणेच मतदारसंघासह राज्यभरातील गोरगरीब, दिनदलित सर्वसामान्यांचे प्रश्न आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केले.
भाई.गणपतराव देशमुख हे कष्टकरी, दिनदलित, सर्वसामान्य गोरगरीबांचा विचार करणारे नेतृत्व होते. विधीमंडळाच्या
माध्यमातून राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.विधानसभेत स्व.भाई.गणपतराव देशमुख यांचे नातू
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचाही आवाज चालू पावसाळी अधिवेशनात घुमत आहे. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यातही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाविषयची तळमळ दिसून आली.
या अधिवेशनामध्ये आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये मागच्या तीन-चार दिवसापासून मुंबई येथील
आझाद मैदानावर नर्सेस (कंत्राटी कामगार) आंदोलन चालु आहे. त्यांच्या मागण्याच्या दखल घ्यावी, आणि तात्काळ मागण्या मान्य कराव्यात.
तसेच पंढरपूर येथे विधीतज्ञ आंदोलन करत आहे. त्यांच्याही मागण्याकडे शासनाकडे लक्ष देवून त्यांच्याही मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी राज्य शासनाकडे केली.
त्याचप्रमाणे राज्यात बर्याचशा महामार्गावर अजूनही ब्रीज पूर्ण झाले नाहीत, सांगोला विधानसभा मतदारसंघात म्हसवड -पंढरपूर या राज्य मार्गावरील उपरी या गावात पुल नाही.
त्याचप्रमाणे याठिकाणी ब्रीज होण्यासही विलंब होत आहे. राज्यात बर्याच ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत.
या ठिकाणी अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असून नॅशनल हायवेवरती त्वरीत स्पीडब्रेकर करावेत अशी मागणी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत लावून धरली.
या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रश्नावर त्वरीत माहिती घेऊन लवकरात लवकर ब्रीज करण्याची कार्यवाही करु असे सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख चालू पावसाळी अधिवेशनात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
0 Comments