google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांची महाराष्ट्र युवा धोरण समितीवर सदस्य म्हणून निवड

Breaking News

आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांची महाराष्ट्र युवा धोरण समितीवर सदस्य म्हणून निवड

आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांची महाराष्ट्र युवा धोरण समितीवर सदस्य म्हणून निवड 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन युवा धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या धोरणाच्या निर्मितीसाठी एक विशेष समिती गठित करण्यात आली असून, या समितीवर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीमध्ये युवा सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक विकास या क्षेत्रांशी संबंधित अन्य व्यक्तींचाही समावेश आहे.

 ही समिती युवा धोरणाचा मसुदा तयार करेल आणि राज्यातील युवकांच्या आकांक्षा आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवेल.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, समितीला धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

 या कालावधीत समिती राज्यभरातील युवक, स्वयंसेवी संस्था आणि इतर भागधारकांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेईल. 

याशिवाय, समिती परदेशातील आणि इतर राज्यांतील यशस्वी युवा धोरणांचा अभ्यास करून त्यांचा समावेश नवीन धोरणात करेल. 

आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख हे स्वतः हा उच्चशिक्षित असून त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील युवकांना त्यांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणारे एक सर्वसमावेशक आणि प्रभावी धोरण मिळण्याची आशा आहे.

Post a Comment

0 Comments