google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेची बैठक संपन्न, वृक्षारोपण व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड चे पत्र राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आला

Breaking News

डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेची बैठक संपन्न, वृक्षारोपण व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड चे पत्र राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आला

डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेची बैठक संपन्न, वृक्षारोपण


व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड चे पत्र राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आला

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812 )

जत (ता.१५ जून) – जत येथे डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेची महत्वाची बैठक आज उत्साहात पार पडली. यावेळी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला तसेच संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची

 निवड राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.बैठकीच्या प्रारंभी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले. 

यानंतर झालेल्या बैठकीत संघटनेच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 

पत्रकारांसमोरील आव्हाने, स्थानिक प्रश्नांवरील माध्यमांची भूमिका, तसेच एकसंधपणे कार्य करण्यासाठी संघटनेच्या पुढील कार्ययोजनेबाबत सखोल चर्चा झाली.

या बैठकीदरम्यान नव्या नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून मनोहर पवार व तालुकाध्यक्ष म्हणून प्रकाश करगणिकर पदाधिकाऱ्यांची निवड होऊन

 त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पत्रकारितेतील जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पत्रकार उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करण्याचा निर्धार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष मनोहर पवार तालुकाध्यक्ष  प्रकाश करगणिकर,जिल्हा कार्यकारिणीत नजीर चट्टरगी,

खजिनदारपदी भागवत काटकर,अमोल कुलकर्णी, विश्वनाथ तळसंगी,प्रमोद मेटकरी,संर्पक प्रमुख विठ्ठल हेगडे, के.अजितकुमार,महमंद शेख,अजित 

सनदी,गोविंद निकम,संतोष गुनकी,तानाजी कदम,संपर्कप्रमुख संजय कोटगोड प्रभाकर गायकवाड, याच्यासह आदी याच्यासह मोठ्यासंख्येत उपस्थित होते.

 दरम्यान या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहन मानेपाटील, डॉक्टर शफिक इनामदार, बंडू शेख याच्यासह आदींनी मिळून

 नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास आभार प्रकाश करगणिकर यांनी मानले

Post a Comment

0 Comments