महाराष्ट्र हादरलं! बायकोने नवऱ्याचे तुकडे तुकडे केले; गोणीत भरून शोषखड्ड्यात फेकला
नाशिक : राजा रघुवंशी हत्या प्रकरण ताज असताना नाशिकमध्ये असाच प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिकमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. नाशिकच्या सुरगणामध्ये बायकोने नवऱ्याला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बायकोने कुऱ्हाडीने घाव घालत नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर बायकोने नवऱ्याचे तुकडे केले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सुरगाणा तालूक्यातील मालगोंदा येथील यशवंत मोहन ठाकरे याची त्याच्या पत्नीने कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली आहे.
हत्येच्या महिन्यानंतर संपूर्ण प्रकार उघडीस आला आहे. यशवंत यांच्या हत्येच्या घटनेने परिसरात एकच भीती पसरली आहे.
प्रकरण कसं उघडकीस आलं?
गेल्या दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये मजुरीसाठी गेलेला मुलगा परत न आल्याने यशवंत यांच्या आई-वडिलांनी सूनेकडे चौकशी केली. मात्र, सून देखील गुजरातच्या बिलीमोरे येथे निघून गेली.
कुटुंबीयांनी मुलगा परत आला नाही, याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाचा काहीच शोध लागला नाही. अखेर यशवंत यांच्या भावाची बायको त्याची पत्नी प्रभाला भेटायला गेली.
यशवंत यांच्या भावाच्या बायकोला घरात काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या. तिने ही बाब तिच्या नवऱ्याच्या कानावर घातली. पुढे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.
पोलिसांनी शोध घेतल्यानंतर यशवंत यांचा घरातील शौषखड्ड्यात मृतदेह आढळला. पोलिसांनी गोणीमधील तुकडे केलेले मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणाचा सुरगाणा पोलीस अधिक तपास करीत आहे.


0 Comments