जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्यासमोर करणार आत्मदहन करणार मा. श्री. दादासाहेब सावंत (ग्रा. पं. सदस्य लोटेवाडी)..!!
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
दलित वस्तीतील निधी इतरत्र मधील सावंत हेगडे वस्ती सन 2019 20 मध्ये मंजूर परंतु सन 2020-21 मध्ये काम पूर्ण करण्यात आले निधी खडीकरण व डांबरीकरण रस्ता
तब्बल पाच लाख रुपये निधी इतरत्र वळवून दलितांच्या हक्क व अधिकारावर अन्याय-अत्याचार करणाऱ्या मा. सरपंच विजय उत्तम खांडेकर यांचे निलंबन करावे
तसेच, त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागणी करता दिनांक 16/6/25 रोजी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय यांच्यासमोर आत्मदहन करणार. संबंधित प्रशासनाकडे व
लोकप्रतिनिधींकडे या संबंधित कारवाई करण्यासाठी दिनांक 6/6/2025 रोजी एका निवेदनाद्वारे मागणी केली होती; परंतु प्रशासनाने त्याबद्दल कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याचबरोबर कारवाई
करण्यासंदर्भातले कोणत्याही प्रकारचे लेखी अथवा तोंडी वा दूरध्वनीवरून कोणत्याही प्रकारचा संपर्क न केल्याने प्रशासनाला जाग आणण्यासाठी तसेच दलित समाजावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी शेवटचा पर्याय उरलेला असून तो म्हणजे
आत्मदहन करणे. राज्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना जीव गमवावा लागत असताना माझ्यासारख्या दलित प्रतिनिधीला प्राण गमावण्याची वेळ येणार आहे. याची नोंद लोकप्रतिनिधी व प्रशासनाने घ्यावी..
जय संविधान जय भीम
0 Comments