google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गण रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश १४ जुलै पासून प्रभाग रचनेचे कामकाज सुरू होणार तर १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द होणार : तहसीलदार मा संतोष कणसे

Breaking News

मोठी बातमी..जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गण रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश १४ जुलै पासून प्रभाग रचनेचे कामकाज सुरू होणार तर १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द होणार : तहसीलदार मा संतोष कणसे

मोठी बातमी..जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गण रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश


१४ जुलै पासून प्रभाग रचनेचे कामकाज सुरू होणार तर १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द होणार : तहसीलदार मा संतोष कणसे

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : मागील काही वर्षांपासुन रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आता होणार असल्याची चिन्ह दिसु लागली आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

त्यानुसार १४ जुलै २०२५ पासून जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण रचना करण्याच्या कामकाजास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली आहे.

यामध्ये २०१७ साली देण्यात आलेल्या आदेशानुसार गट व गण रचना राहतील अशी शक्यता आहे. अर्थात सांगोला तालुक्यात जिल्हापरिषदेचे ७ गट असणार आहेत 

तर पंचायत समितीचे १४ गण राहणार आहेत. दरम्यान यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्णायक भूमिका देण्यात आहे.

यामध्ये प्रारूप प्रभाग रचना काम दि. १४ जुलै रोजी सुरू केले जाणार आहे त्याबाबत अहवाल सादर केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत प्रकाशित केला जाणार आहेत.

 त्यानंतर प्रसिध्द झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दि. २१ जुलै अखेर मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती दाखल

 करण्यासाठी मुभा आहे. तसेच दि. २८ जुलै अखेर जिल्हाधिकारी यांनी दाखल झालेल्या हरकती सुचनांचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. 

त्यानंतर प्राप्त हरकती सुचनांवर दि. ११ ऑगस्ट पर्यंत विभागीय आयुक्त यांच्या मार्फत सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच दि. १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द केली जाणार आहे. असल्याचे ही तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, गेली काही वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी जिल्हा परिषद सदस्य व भावी

 पंचायत समिती सदस्य यांना आता कामाला लागावे लागणार आहे. येत्या काळात निवडणुका जाहीर होणार असून दिवाळीपूर्वीच निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments